औरंगाबाद : हर्सूल कचरा डेपोला आग, यंत्रांसह शेड खाक

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंब घटनास्थळी तातडीने दाखल
Aurangabad Hersul waste depot fire
Aurangabad Hersul waste depot fire sakal

औरंगाबाद : हर्सूल येथे उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचरा डेपोला सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आग लागली. या घटनेत पत्र्याचे शेड जळून खाक झाले. तसेच खासगी संस्था असलेल्या इको-सत्वच्या दोन बेलिंग मशीन जळाल्याने मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

हर्सूल येथे दररोज दिडशे टन कच-यावर प्रक्रिया करणा-या क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या या ठिकाणी सुक्या कच-यावर प्रक्रिया सुरू आहे. तीन प्रभागातील सुका कचरा या ठिकाणी आणला जातो. महापालिकेने प्रकल्प उभारण्यासाठी पत्र्याचे शेड तयार केले आहे. याच्या जवळच सुक्या कच-यावर इको - सत्व या खासगी संस्थेच्या माध्यमातुन प्रक्रिया करण्याचे काम केले जाते.

सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कच-याला अचानक आग लागली. धूर आणि आगीचे लोळ उठलेले दूरून दिसायला लागले. हे पाहून गावातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धावाधाव सुरू केली. महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला याविषयी कळवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. दोन तासांत आग आटोक्यात आणण्यात आली. घनकचरा विभाग प्रमुख तथा महापालिका उपायुक्त सोमनाथ जाधव, अग्निशमन दलाचे प्रमुख राजू सुरे यांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. या आगीत कच-यासह पत्र्याचे शेड जळून खाक झाले. तसेच एनजीओ संस्थेच्या दोन बेलिंग मशीन जळून नुकसान झाल्याचे उपायुक्त श्री. जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com