esakal | विद्यापीठाचा दिलासा, तासिका तत्त्वावर  १५१ प्राध्यापकांची नियुक्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

bamu news

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मंजूर २५९ प्राध्यापकांच्या जागापैकी १२७ जागा रिक्त आहेत.

विद्यापीठाचा दिलासा, तासिका तत्त्वावर  १५१ प्राध्यापकांची नियुक्ती 

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तासिका तत्त्वावर १५१ प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. एका बाजूला राज्य शासनाच्या मान्यतेअभावी संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती रखडलेली असताना विद्यापीठाने पीएचडी व नेट-सेट धारकांना दिलासा दिला आहे. 

औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मंजूर २५९ प्राध्यापकांच्या जागापैकी १२७ जागा रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी एकत्रित वेतन तसेच तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला. 

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा


पदार्थविज्ञान (६), उस्मानाबाद पदार्थविज्ञान (०), इलेक्ट्रॉनिक्स (२), रसायनशास्त्र (१०), जीवरसायनशास्त्र (३), रसायन तंत्रज्ञान (२), दिनदयाळ उपाध्याय कौशल केंद्र (१४), वनस्पतिशास्त्र (७), प्राणिशास्त्र (३), पर्यावरणशास्त्र (०), गणित (२), गणित उस्मानाबाद (२), पत्रकारिता (७), वाणिज्य (२), व्यवस्थापनशास्त्र (१२), व्यवस्थापनशास्त्र उस्मानाबाद (७), पर्यटन प्रशासन (२), मराठी (२), इंग्रजी उस्मानाबाद (१), उर्दू (२), पाली (२), मानसशास्त्र (२), गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (७), इतिहास (३), भूगोल (४), राज्यशास्त्र (३), उदार कला (३), फुले-डॉ.आंबेडकर विचारधारा (३), नाट्यशास्त्र (३), संगीत (२), ललित कला विभाग (२), विधी (३), शारीरिक शिक्षण (३), स्त्री अभ्यास केंद्र (१), जीवरसायनशास्त्र (१), जैवतंत्रज्ञान (१), जल व भूमी व्यवस्थापन (२), नाट्यशास्त्र (१), शिक्षणशास्त्र (२), शिक्षणशास्त्र उस्मानाबाद (३), प्रीआयएस केंद्र (१०), मॉडेल कॉलेज घनसावंगी (५) याप्रमाणे पदे भरण्यात आली आहेत. 
 

Edited - Ganesh Pitekar

loading image