esakal | बीड बायपासवर अपघातांचे सत्र सुरुच, ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal News

सचिन व नितेश हे दोघेही देवळाई येथील कंत्राटदार बाबा भाई यांच्याकडे जेसीबी चालकाचे काम करीत होते.

बीड बायपासवर अपघातांचे सत्र सुरुच, ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील सुर्या लॉन्सजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्‍या ट्रकने दुचाकीला ठोकरले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण उपचारादरम्यान ठार झाल्याची घटना बुधवारी (ता.२७) दुपारी अडीच वाजेदरम्यान घडली. दोन दिवसांपूर्वी बायपासवर सोमवारी (ता.२५) अपघात झाला. यात सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कल्याण राठोड (३२), नितेश पुंडलिक पवार (२५, दोघे रा. पोरगाव तांडा, ता. पैठण, ह.मु नाईक नगर, बंजारा हीलजवळ शिवाजीनगर) असे अपघातात मृत झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.

नवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले!!! 

सचिन व नितेश हे दोघेही देवळाई येथील कंत्राटदार बाबा भाई यांच्याकडे जेसीबी चालकाचे काम करीत होते. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बीड बायपास रस्त्याने पैठणकडे जात असताना सुर्या लॉन्ससमारे त्यांच्या दुचाकीस भरधाव जाणाऱ्या ट्रकने (एमएच-०४-जीआर-४९६०) जोराची धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी प्रथम खासगी आणि नंतर घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला.

न थांबता सलग चोवीस तास सादर केली मराठमोळी लावणी, लातूरच्या कन्येने रचला इतिहास

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. मात्र, अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. त्याचा शोध सुरु असून या अपघाताची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

जमावाने ट्रक फोडला 
अपघात घडताच ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. त्यानंतर तेथील जमावाने ट्रकवर दगडफेक केली. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक जाम झाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. 

Edited - Ganesh Pitekar
 

loading image