गावांत पाणीटंचाईला सुरवात, जलस्त्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा

केवळ २० तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना आणि ८ विशेष पाणीपुरवठा दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहीती जिल्‍हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.
Water supply
Water supply

औरंगाबाद : उन्हाची दाहकता वाढताच जिल्ह्यातील शेकडो गावांना आता पाणीटंचाईचे (Water Shortage) चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या स्थितीत तब्बल २५० गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी जिल्ह्यात एकाही गावात पाणी टॅंकरची गरज नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५० गावांत पाणीटंचाई जाणवते. मात्र, यावर्षी पाऊस (Rain) चांगला झाल्याने पाणीसाठे भरलेले आहेत. (Aurangabad Latest News Water Shortages In Villages)

Water supply
औरंगाबादेत आज फक्त १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरण

त्यामुळे केवळ २० तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना आणि ८ विशेष पाणीपुरवठा दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहीती जिल्‍हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान विभागाला तात्पुरते कनिष्ठ भुवैज्ञानिक १५ दिवसांसाठी मिळाले त्यांनी १५ रखडेलेले प्रस्ताव मार्गी लावले. तर रजेवरील कनिष्ठ भुवैज्ञानिक सय्यद रुजू झाल्याने कामकाज नियमित सुरु झाले आहे. तसेच आणखी एक नविन पद भरण्याची प्रक्रीया सुरु असुन तोपर्यंत वरिष्ठ भुवैज्ञानिकांना रखडलेली १५ व्या वित्त आयोगाची स्त्रोताची कामांना प्रमाणपत्र देण्याचे कामे मार्गी लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com