esakal | होम आयसोलेशनची संख्या तब्बल ७० टक्क्‍यांनी घटली

बोलून बातमी शोधा

covid 19
होम आयसोलेशनची संख्या तब्बल ७० टक्क्‍यांनी घटली
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनासंर्गाची स्थिती अद्याप गंभीर असली तरी नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. होम आयसोलेशन म्हणजेच घरी राहून उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ७० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचबरोबर रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेच्या कोविड केअर सेंटर्ससह घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालय, खासगी रुग्णालयांवरील भार काहीसा कमी झाला आहे. शहरात महिनाभरापूर्वी घरीच होम आयसोलेशनद्वारे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्या घरात केली होती. कोविड केअर सेंटर, खासगी, सरकारी रुग्णालये फुल्ल झाल्याने प्रशासनाने ज्यांना कमी लक्षणे आहेत, त्यांनी घरीच थांबून उपचार घ्यावेत, अशी सक्ती केली होती.

हेही वाचा: पैठण तालुक्यातील चितेगाव, पांगरा, जांभळीत जोरदार पाऊस; पिकांचे नुकसान

पण त्यांच्याकडे स्वतंत्र स्वच्छतागृह, डॉक्टरांकडून उपचाराची हमी आवश्‍यक होती. त्यामुळे व्यवस्था असणाऱ्यांनी घरीच राहून उपचार घेणे पसंत केले. रुग्णसंख्येत घट होत असल्याने घरी राहून उपचार घेणाऱ्यांची संख्या आता दीड हजारांवर आली आहे. २७ मार्चला शहरात घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या चार हजार ९९४ एवढी होती. ती २७ एप्रिलला १,५०९ पर्यंत खाली आली आहे. ७० टक्क्यांनी होम आयसोलेशनच्या रुग्णांत घट झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यासोबतच रुग्णांमध्ये घट होत असल्याने रुग्णालयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

शहरातील रुग्णांमध्ये महिनाभरात झालेली घट

रुग्णालयांची नावे /२७ मार्च ते २७ एप्रिल

घाटी रुग्णालय --------५१८ ३००

जिल्हा सामान्य रुग्णालय-- १५८ १२०

मेल्ट्रॉन रुग्णालय --------३१० ३३०

खासगी रुग्णालये --------२,५२८ १,२९७

महापालिका कोविड सेंटर्स-- २,७१८ १,२२७

होम आयसोलेशन ---------४,९९४ १,५०९