esakal | औरंगाबाद : आमदार सतीश चव्हाण यांची अतिवृष्टीग्रस्त भागात पीक पाहणी । Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार सतीश चव्हाण यांची अतिवृष्टीग्रस्त भागात पीक पाहणी

आमदार सतीश चव्हाण यांची अतिवृष्टीग्रस्त भागात पीक पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गुलाब चक्रीवादळामुळे अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. पुरामुळे नदीकाठच्या गावातील जनावरे, दुकाने वाहून गेली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह, दुकानदारांना त्वरीत नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशा सूचना आमदार सतीश चव्हाण यांनी वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांना केली.

हेही वाचा: बँकेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतीश चव्हाण दोन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा पाहणी दौरा करून पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आहेत. शुक्रवारी (ता. एक) त्यांनी वैजापूर तालुक्यातील बोरसर, कोरडगाव, खंडाळा तसेच गंगापूर तालुक्यातील बाबरगांव, येसगांव, तुर्काबाद खराडी आदी ठिकाणी भेटी देऊन शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. बोरसर येथे नदीकाठच्या शेतकऱ्‍यांची बरीच जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे जनावरांची नुकसान भरपाईच्या पंचनाम्यात अडथळे येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी सतीश चव्हाण यांच्याकडे केली.

हेही वाचा: नांदेड : निवासी डॉक्टरांची कोविड भत्त्यासाठी लढाई सुरुच

या ठिकाणी घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून हातावर पोट असणार्‍या ग्रामस्थांची छोटी-मोठी दुकांनामध्ये पाणी शिरल्याने दुकांनातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला नुकसान शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. कोरडगाव येथील पाझर तलाव फुटल्याने शेत जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

प्रशासकीय पातळीवर त्वरीत पाठपूरावा करून पाझर तलावाचे काम करून दिल्या जाईल असे आश्वासन आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी कोरडगाव ग्रामस्थांना दिले. खंडाळा येथील नुकसानग‘स्त भागाची पाहणी करून सतीश चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे आदींसह आढावा बैठक घेतली. नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिकांसह दुकानदारांना शासनाच्या निकषाप्रमाणे त्वरीत आर्थिक मदत द्यावी. एकही नुकसानग्रस्त व्यक्ती नुकसान भरपाईपासून वंचित राहता कामा नये अशा सूचना सतीश चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्‍यांना दिल्या.

loading image
go to top