esakal | खूशखबर! आता औरंगाबादहून दररोज सकाळी मुंबईसाठी 'विमानसेवा'
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad to mumbai

याअगोदर या विमानाची सेवा औरंगाबादहून दुपारी 12:10 ला मुंबईला रवाना होत होते

खूशखबर! आता औरंगाबादहून दररोज सकाळी मुंबईसाठी 'विमानसेवा'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद : आता येणाऱ्या 8 जानेवारीपासून इंडिगोचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान दुपारऐवजी सकाळच्या वेळेत उड्डाण घेणार आहे. त्यामुळं मुंबईकडे लवकर जाणाऱ्या प्रवाशांच्या या नवीन बदलांचा मोठा फायदा होणार आहे. 

प्रवांशांची मागणी होती-
इंडिगो कंपनीने काही दिवसांपुर्वी प्रवाशांची मागणी पाहता मुंबईकला जाण्यासाठी रोज विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. आताची परिस्थिती पाहिली तर सध्या ही विमानसेवा आठवड्यातून फक्त 3 दिवस आहे. आता 8 जानेवारीपासून हे विमान मुंबईकडे दररोज उड्डाण घेणार आहे. मुंबईसाठी औरंगाबादमधून रोज हवाई सुविधा उपलब्ध राहणार आहे.

'औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करायचं, असं मुख्यमंत्री म्हणालेत का?'

याअगोदर या विमानाची सेवा औरंगाबादहून दुपारी 12:10 ला मुंबईला रवाना होत होते. मुंबईमध्ये पोहोचेपर्यंत दुपारचे 1 वाजून जात होते. त्यामुळे निम्मा दिवस मुंबईत आणि निम्मा दिवस औरंगाबादेत अशी अवस्था होत होती. यामुळे जी कामं करायची त्यात बऱ्याच अडचणी येत होत्या.

पाणी पिताना सहा म्हशींवर विद्युतवाहिनी पडल्याने तडफडून मृत्यू; महावितरणची दिरंगाई पुन्हा दिसली

या कारणास्तव औरंगाबादहून मुंबईला सकाळी लवकर उड्डाण झाले पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. यासाठी पाठपुरावाही करण्यात आला होता. त्यामुळे अखेर येणाऱ्या 8 तारखेपासून औरंगाबादहून मुंबईसाठी सकाळी 10:20 ला विमानाचे उड्डाण होईल, अशी माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली आहे. तसेच सप्ताहात 3 दिवसांसाठी एअर इंडियाचीही मुंबईसाठी विमानसेवा सुरु आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान ३ दिवस सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत औरंगाबादेत परतणेही प्रवाशांना शक्य होणार आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top