esakal | भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून, औरंगाबादच्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या विषयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ऐरणीवर घेतलेला हा विषय धार्मिक तेढ निर्माण करणारा असल्याचा आरोप काही पक्षांनी केला आहे.

भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून, औरंगाबादच्या...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजपतर्फे केली जात आहे;  मात्र प्रस्ताव चर्चेसाठी घेतला जात नसल्यामुळे गुरुवारी भाजपच्या नगरसेवकांनी काळे कपडे घालून सर्वसाधारण सभेत येत महापौरांचा निषेध केला. सभेला सुरुवात होताच चौथे स्मरण पत्र महापौरांना देण्यात आले.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या विषयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ऐरणीवर घेतलेला हा विषय धार्मिक तेढ निर्माण करणारा असल्याचा आरोप काही पक्षांनी केला आहे.

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

विकासाचे मुद्दे सोडून संभाजीनगरचा वादग्रस्त विषय कशाला आणता? दिल्लीच्या पराभवानंतर तरी जमिनीवर या, तुमचा मुख्यमंत्री असताना हा विषय का आणला नाही? या अशा शब्दांत शिवसेना व एमआयएम पक्षाने गेल्या सर्वसाधारण सभेत भाजपची कोंडी केली होती. मात्र, गुरुवारी (ता. २७) भाजपच्या काही सदस्यांनी पुन्हा महापौरांना संभाजीनगर प्रस्तावाचे चौथे स्मरणपत्र दिले. 

पुन्हा एका बालिकेवर अत्याचार.. वाचा कुठे

महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांच्यासह इतर नगरसेवकांनी नामकरणाच्या विषयावर महापौरांना स्मरणपत्र दिले. राठोड यांनी दिलेल्या स्मरणपत्रात आतापर्यंत अनेकदा मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची आठवण करून दिली. 

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

loading image
go to top