औरंगाबाद महापालिका निवडणुक : कॉंग्रेसचा एकला चलोचा नारा...

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद- महाविकास आघाडीतील पक्ष सोबत आले तर महापालिकेची निवडणुका एकत्रित लढू; अन्यथा कॉंग्रेसची संपूर्ण ११५ जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हा नियोजन मंडळ तयार करून नियोजन केले जात असल्याचे महापालिका निवडणूक निरीक्षक मुजफ्फर हुसेन यांनी शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत सांगितले. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा शहागंज येथील गांधीभवनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना श्री. हुसेन म्हणाले, ‘‘शहरात अनेक प्रश्‍न आहेत. रस्ते, पाणी, कचरा, कर कमी करणे या विषयावर मेळाव्यात चर्चा झाली. या चर्चेच्या आधारावर महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा जाहीरनामा तयार केला जाईल.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याची कॉंग्रेसची तयारी आहे; मात्र सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत किंवा आमच्या सोबत कोणी आले नाही तर ११५ जागा लढण्याची तयारी पक्षाने केली आहे, अशा इशारा हुसेन आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला दिला. पत्रकार परिषदेला निरीक्षक दादासाहेब मुंडे, किशोर गजभिये, जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश मुगदिया यांची उपस्थिती होती. 
 
आक्षेपांची आयोगाने दखल घ्यावी 
महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्ड रचनेत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आले असून, त्यावर आक्षेपही घेण्यात आलेले आहेत. सलग पाच वॉर्डात आरक्षणे टाकण्यात आली आहेत. कॉंग्रेसच्या विचारांचे मतदार अनेक वॉर्डात विभागले गेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने या आक्षेपांची योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी मुज्जफर हुसेन यांनी केली. 

हेही वाचा : योगी ठाकूर यांना ही जाब विचारा  - इम्तियाज जलील
 
औरंगाबादची निवडणूक महत्त्वाची 
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद महापालिकेची निडणूक महत्त्वाची असून, या निवडणुकीनंतर मराठवड्यातील ३० नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पक्षासाठी ही निवडणूक परिणामकारक ठरणार आहे, असे दादासाहेब मुंडे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com