कोरोनचा धोका आणि महापाैरांनी केली ही मागणी...

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद : जगभरातील सुमारे ५० देशांत कोरोना व्हायरसची लागण झाली असून, राज्यातील पुणे, नाशिकमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात हजारो पर्यटक येतात. त्यामुळे शहरात देखील कोरोना व्हायरसची कधीही लागण होऊ शकते. त्यामुळे महापालिकेची एप्रिल महिन्यात होणारी निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी व विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. ११) सांगितले. 

पत्रकारांसोबत बोलताना महापौर पुढे म्हणाले, कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक उत्सवात गर्दी टाळण्यात यावी, उत्सव घेतले जाऊ नये अशी सूचना केली आहे. त्यामुळे महापालिकेने सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली असून, निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते; मात्र कोरोनामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणात निर्भयपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होऊ शकणार नाही, त्याकरिता सहा महिने निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे केली असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. 

नगरसेवकांना द्या मुदतवाढ 
खासदार इम्तियाज जलील यांनी महापालिका निवडणूक पुढे ढकलून प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यावर महापौर म्हणाले, की पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २९ एप्रिलला संपत आहे. मात्र सहा महिन्यांची मुदतवाढ देताना प्रशासकाची नियुक्ती करण्याऐवजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी काळजीवाहू म्हणून काम करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com