esakal | यासाठी केले तब्बल ७० हजार घरांचे सर्वेक्षण 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad amc news

महापालिकेने आतापर्यंत उच्चभ्रू वसाहतीतील तब्बल ७० हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात दीडशे जण विदेशातून आल्याची माहिती समोर आली आहे. यातील ६२ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

यासाठी केले तब्बल ७० हजार घरांचे सर्वेक्षण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेने शहरात ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत उच्चभ्रू वसाहतीतील तब्बल ७० हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात दीडशे जण विदेशातून आल्याची माहिती समोर आली आहे. यातील ६२ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. शहरात गेल्या काही दिवसांत पुणे, मुंबई, नाशिकसह इतर जिल्ह्यांतून चार ते पाच हजार नागरिक आलेले आहेत. या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी महापालिकेने नगर नाका, छावणी, पैठण रोड, बीड बायपास, केंब्रिज रोड, हर्सूल येथे स्क्रीनिंग केले जात आहे. शहराच्या प्रवेशद्वारांवर तपासणी सुरू असताना दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे.

विदेशातून आलेल्या नागरिकांच्या नोंदी घेण्यासोबतच इतर जिल्ह्यांतून प्रवास करून आलेल्यांची तपासणीही केली जात आहे. आरोग्य विभागातर्फे सुमारे ७० हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात दीडशे जण विदेशातून शहरात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. यातील ६२ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. विदेशातून शहरात आलेल्यांचा शोध सुरू असतानाच परजिल्ह्यांतून शहरात आलेल्यांचा शोधदेखील घेतला जाणार आहे. 

मोफत पाणी, पोषण आहार द्या 
शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार सुरू करण्यात यावा, नागरिकांना मोफत पाणी द्यावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. शाळांना सुट्या असल्यामुळे पोषण आहारही बंद करण्यात आला आहे; मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ता. २७ मार्चला काढले आहेत. त्यानुसार शहरी भागातदेखील विद्यार्थ्यांसाठी मोफत आहार सुरू करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image