esakal | औरंगाबादेत महापालिका करणार घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad amc news

प्रत्येक प्रभागात ‘गणेशमूर्ती संकलन वाहन’ असे फलक लावलेली वाहने उभी असतील. एकूण २३ जागेवर अशी सोय केली जाणार आहे. त्या भागातील गणेशमंडळांच्या स्टेजचा वापर यासाठी केला जाणार आहे.

औरंगाबादेत महापालिका करणार घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या घटली असली तरी घरोघरी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. म्हणून विसर्जनाच्या दिवशी शहरातील ११ विहिरींवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातून संसर्ग वाढण्याची भीती असल्याने महापालिकेने २३ ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकारण्याची सोय केली आहे. 

महापालिकेतर्फे दरवर्षी शहराच्या विविध भागांत गणेशविसर्जनासाठी ११ विहिरींची साफसफाई केली जाते. यंदाही या विहिरींच्या सफाईचे काम सुरू आहे. प्रत्येक वर्षी या विहिरींवर सार्वजनिक व घरगुती गणेश मंडळाची गर्दी होती. यंदा मात्र कोरोनामुळे गर्दी टाळावी लागणार आहे. म्हणून महापालिकेतर्फे प्रत्येक वॉर्डातील ठराविक जागेवर गणेशमूर्ती स्वीकारल्या जाणार आहेत. यासंदर्भात मंगळवारी (ता.२५) शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी बैठक घेत जागा निश्‍चित केल्या.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. पानझडे म्हणाले, गणेश विसर्जन विहिरींव्यतिरिक्त प्रत्येक प्रभागात ‘गणेशमूर्ती संकलन वाहन’ असे फलक लावलेली वाहने उभी असतील. एकूण २३ जागेवर अशी सोय केली जाणार आहे. त्या भागातील गणेशमंडळांच्या स्टेजचा वापर यासाठी केला जाणार आहे. मूर्ती संकलित केल्यानंतर विसर्जन महापालिकेच्या विसर्जन विहिरींमध्ये केले जाणार आहे. ११ वाहनांची जबाबदारी यांत्रिकी विभागाचे उपअभियंता डी. के. पंडित यांच्याकडे दिली जाणार आहे. 
 
निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था 
गणेशमूर्ती स्वीकारण्यासोबत निर्माल्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यावर ही जबाबदारी असून, जमा झालेल्या निर्माल्याचे खत तयार करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे श्री. पानझडे यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

या ठिकाणी सोय 
खडकेश्‍वर मंदिर, पडेगाव, सावरकर चौक समर्थनगर, गुलमंडी,  एन-१० पोलिस कॉलनी, यशोधरा कॉलनी, जिव्हेश्‍वर कॉलनी,  टीव्ही सेंटर शॉपिंग कॉम्प्लेक्स, मध्यवर्ती कारागृहाजवळील खुली जागा, एन-५ राजीव गांधी स्टेडियम, गरवारे स्टेडियम, चिकलठाणा आठवडे बाजार, कामगार चौक, मुकुंदवाडी बसस्टॉप,  गजानन महाराज चौक, कॅनॉट प्लेस, सूतगिरणी चौक, विद्यानगर कृत्रिम तलाव,  देवळाई चौक बीड बायपास, जाबिंदा सिग्नल, बीड पायपास, कांचनवाडी बसस्टॉप,  अयोध्यानगर, ज्योतीनगर पाण्याच्या टाकीजवळ, संत एकनाथ रंगमंदिर. 

loading image