Aurangabad : शहरासाठी मनपाने मागविल्या ६५ हजार लसी

कोरोना संसर्गाच्या संभाव्य लाटेपूर्वी तयारी, रुग्णालयांत खाटाही उपलब्ध
Coronavirus
Coronavirusesakal

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची नवी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने देशभर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी देखील सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांसाठी सात सेंटर सुरू करण्यात आले आहेत. महापालिका, घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य व खासगी रुग्णालयात आठ हजार १४१ बेड उपलब्ध असतील. तसेच कोविशिल्डच्या ५० हजार व कोर्बोव्हॅक्सच्या १५ हजार अशा ६५ हजार लसी मागविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोना संसर्गाने चीनमध्ये पुन्हा एकदा थैमान घातले आहे. त्यामुळे देशभर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. काल राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे सूचना केल्या. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. पुन्हा कोरोना संसर्ग पसरल्यास उपाययोजना म्हणून महापालिकेने तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या मेल्ट्रॉन, एन-८, एन-११, नेहरूनगर, आयओसी पदमपुरा या पाच आरोग्य केंद्रांत ऑक्सिजनचे ६४५ बेड तर दहा व्हेंटिलेटर आहेत.

सरकारी व खासगी रुग्णालय मिळून व्हेंटिलेटरचे ४०२, आयसीयू आणि ऑक्सिजनचे ५४०, ऑक्सिजनचे ३३४४ आणि आयसोलेशनसाठी ३८५५ असे एकूण आठ हजार १४१ बेड उपलब्ध आहेत. सध्या कोव्हॅक्सिनच्या १६ हजार लसी उपलब्ध असून या लसीची मुदत ३१ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे ५० हजार कोविशिल्ड आणि १५ हजार कोर्बोव्हॅक्स अशा ६५ हजार लसींची मागणी करण्यात आली आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com