esakal | बालकांसाठी शहरात ९१९ बेड, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

20coronavirus_105_0

बालकांसाठी शहरात ९१९ बेड, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची Corona Infection दुसरी लाट ओसरली असली तरी प्रशासनस्तरावर तिसऱ्या लाटेसाठी तयारी केली जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरातील एक कोविड केअर सेंटर, नऊ डीसीएचसी व १० डीसीएचमध्ये ९१९ बेडची व्यवस्था करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या Aurangabad वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा जोगदंड यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारी बाबत डॉ. जोगदंड यांनी सांगितले की, गरवारे कंपनीतर्फे १२५ बेडचे बाल कोविड केअर सेंटर सुरू केले जात आहे. हे काम पूर्णत्वास येत आहे. त्यात एक ते बारा वर्षापर्यंतच्या मुलांवर उपचार केले जातील. बारा ते अठरा वयोगटातील बालकांसाठी एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये १०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले जात आहे. महापालिकेच्या Aurangabad Municipal Corporation मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये ५० बेड अशी एकूण २७५ बेडची तयारी करण्यात आली आहे.aurangabad news 919 beds for children in possible third wave of covid19

हेही वाचा: रेल्वे मंत्रालयाचे कामकाज सोळा तास चालणार : रावसाहेब दानवे

तसेच महापालिकेच्या एन-८ येथील आरोग्य केंद्रात कोविडग्रस्त गरोदर महिलांसाठी ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. जोगदंड यांनी दिली. बालकांसाठी एक सीसीसी, नऊ डीसीएचसी आणि १० डीसीएचमध्ये ९१९ बेड असतील. त्यात एनआयसीयू-७३, पीआयसीयू-१६५, एचओटू-६७१ याप्रमाणे बेडची आहेत. बालकांसाठी ४५ व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बालकांसाठी जोरदार तयारी करण्यात आली असली तरी ज्येष्ठांसाठी सात हजार ७३३ बेडची व्यवस्था आहे. सध्या पाच हजार ५३९ बेड वापरात आहेत तर दोन हजार १९४ बेड वापरात नाहीत.

हेही वाचा: Aurangabad Corona Updates : दिवसभरात ४७ जणांना कोरोनाची बाधा

प्रशिक्षित ५४ डॉक्टर सज्ज

सध्या दुसरी लाट ओसरली असल्याने आरोग्य विभागाला उसंत मिळाली आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेसाठी डॉक्टर्स, नर्स सज्ज झाले आहेत. त्यासाठी घाडी रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात आले आहे. पिडीयाट्रिक डॉक्टर्स-६, एमबीबीएस-८, बीएएमएस-१४, स्टाफनर्स-१८, जीएनएम-८ या प्रमाणे ५४ जणांना १४ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासोबतच प्रसूतिगृहात कोविड महिलांसह नवजात बालकांवर उपचार करण्यासाठी एमबीबीएस-२, बीएएमएस-४, स्टाफनर्स-१६ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. बाल कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यासाठी आठ बालरोग तज्ज्ञांची निवड प्रशासनाने केली असल्याच डॉ. जोगदंड यांनी सांगितले.

loading image