esakal | डोळ्यांदेखत असं झालं, की त्या आजोबाचं काळीज चर्रकन चिरलं...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

अरुंद गल्लीतून पाण्याचे टँकर वळण घेत असतानाच आजोबांसोबत खेळत असलेला अफान घाबरला. यातच तोल गेल्याने ओट्यावरून खाली पडला व वळण घेणाऱ्या टँकरच्या चाकाखाली आला. चाक त्याच्या पोटावरून जात असल्याचे पाहून नागरिकांनी आरडाओरड केली. पण तोपर्यंत टँकरखाली अफान चिरडला गेला. 

डोळ्यांदेखत असं झालं, की त्या आजोबाचं काळीज चर्रकन चिरलं...

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद - पाण्याचे टँकर वळविताना चाकाखाली आल्याने सातवर्षीय बालकाचा चिरडून मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (ता. सहा) सकाळी सिल्लेखाना परिसरातील महिला भरोसा केंद्रानजीकच्या गल्लीजवळ घडला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अफान आरेफ कुरेशी (वय सात, रा. सिल्लेखाना) असे मृत बालकाचे नाव आहे.

सिल्लेखान्यातील चिंचोळ्या गल्लीत सोमवारी सकाळी पाण्याचे खासगी टँकर (एमएच १९ एक्स १०७१) घेऊन चालक बाळू भुजंग बेरचे (वय २४, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा) गेला होता.

या अरुंद गल्लीतून पाण्याचे टँकर वळण घेत असतानाच आजोबांसोबत खेळत असलेला अफान घाबरला. यातच तोल गेल्याने ओट्यावरून खाली पडला व वळण घेणाऱ्या टँकरच्या चाकाखाली आला. चाक त्याच्या पोटावरून जात असल्याचे पाहून नागरिकांनी आरडाओरड केली. पण तोपर्यंत टँकरखाली अफान चिरडला गेला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

या घटनेनंतर अफानला नागरिकांनी लगेचच घाटी रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी टँकरचालक बेरचेला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अफानचे वडील आरेफ कुरेशी व्यापारी आहेत. अफानला थोरला भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

क्षणांत होत्‍याचे नव्हते... 

सातवर्षीय अफान आजोबांजवळ होता; पण अचानक तोल जाऊन तो चाकाखाली आला. क्षणांत होत्याचे नव्हते झाल्याने सिल्लेखाना परिसरात शोककळा पसरली. या अपघातानंतर टॅंकरचालक बेरचे तेथेच थांबून राहिला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

loading image