औरंगाबाद : खासगी ट्रॅव्हल्स चालकांचा प्रवासी कर वाचविण्याचा फंडा

आरटीओची धडक कारवाई सुरू
Aurangabad Private Travels Driver tax evasion fund
Aurangabad Private Travels Driver tax evasion fund sakal media

औरंगाबाद : कॉन्ट्रॅक्ट कॅरेजवर चालणाऱ्या खासगी प्रवासी वाहतुकीच्या (Private Travel) ट्रॅव्हल्स बस, टेम्पो, टुरिस्ट वाहने अशा तब्बल ९०० वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अचानक ब्लॅकलिस्ट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरोना (Corona) काळात दिलेल्या सवलतीचा वाहनधारकांनी गैरफायदा सुरू केल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे लक्षात आले, त्यामुळे तातडीने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली.

Aurangabad Private Travels Driver tax evasion fund
फोनची स्क्रिन ठरवते आपला मूड ते राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता

प्रवासी वाहतूक करणाऱ्या विविध संवर्गातील खासगी वाहनांना आरटीओ कार्यालयामार्फत परवानगी दिली जाते. खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रति प्रवासी कर शासनामार्फत आकारला जातो. विविध म्हणजे ३० सीटर, ३५ सीटर, ५० सीटर अशा विविध वाहनाना आसनक्षमतेनुसार हा कर बदलत जातो. एका वाहनाला प्रति वर्ष चार ते पाच हजार रुपये प्रति प्रवासी याप्रमाणे कर आकारला जातो. यामध्ये वातानुकूलित वाहनांसाठी आणि विना वातानुकुलित वाहनांसाठी वेगवेगळा कर आहे.

वातानुकूलित वाहनांसाठी हा कर प्रति प्रवासी साधारण दीडशे ते दोनशे रुपये वाढतो, त्याप्रमाणे वाहनाच्या आसन क्षमतेनुसार हा कर भरावा लागत असतो. मात्र कोरोनाच्या काळात ऑनलाईन पद्धतीमध्ये वातानुकुलित वाहनांना विना वातानुकूलित करण्याची सुविधा काही काळासाठी देण्यात आली होती. याच काळामध्ये अनेक खासगी वाहतूकदारांनी वातानुकूलित वाहने विना वातानुकूलित दाखवून प्रवासी कर भरला. त्यामुळे शासनाचे मोठे नुकसान झाले, अशी वाहने सर्रास रस्त्यावर सुरू आहेत.

Aurangabad Private Travels Driver tax evasion fund
उत्तराखंडमध्ये भाजपला डबल दणका; मंत्र्यासह आमदाराचा राजीनामा?

हा प्रकार लक्षात आल्यामुळे तातडीने आरटीओ कार्यालयाने जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ९०० कॉन्ट्रॅक्ट कॅरेज वाहनांना काळया यादीत टाकण्याचा निर्णय घेतला. किती वाहनांनी टॅक्स वाचविण्यासाठी हेराफेरी केली, हे शोधणे अवघड असल्यामुळे सर्वच्या सर्व वाहने ब्लॅकलिस्ट केली आहेत.

या वाहनधारकांनी आरटीओ कार्यालयात संपर्क साधून कागदपत्रे दाखवावीत, यासाठी दररोज संध्याकाळी पाच वाजता पाच निरीक्षकांमार्फत वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या वाहनांनी हेराफेरी केली त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, ज्या वाहनांनी असा प्रकार केला नाही, त्या वाहनांना ब्लॅक लिस्ट मधून तातडीने काढण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

Aurangabad Private Travels Driver tax evasion fund
राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू; अनिल परबांची घोषणा

"खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची हेराफेरी लक्षात आल्यामुळे नाईलाजाने सर्वच्या सर्व वाहने ब्लॅकलिस्ट करावी लागली आहेत. वाहनधारकांची कागदपत्रे तपासून हेराफेरी करणाऱ्या वाहनधारकांकडून दंड वसूल केला जात आहे. उर्वरित वाहने ब्लॅक लिस्ट मधून काढली जात आहेत."

- संजय मैत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com