esakal | कोरोना लसीसाठी धावाधाव, तब्बल ५५ हजार जण प्रतिक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना लस

कोरोना लसीसाठी धावाधाव, तब्बल ५५ हजार जण प्रतिक्षेत

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीसाठी Corona Vaccination शहरात नागरिकांची धावाधाव सुरूच आहे. कोव्हिशिल्ड Covishield लसीच्या दुसऱ्या डोससाठी वेटिंग तब्बल ५५ हजारांच्या पुढे गेली आहे. अनेकांचे शासनाने ठरवून दिलेले ८४ दिवस कधीच संपले असून, दररोज चौकशी करूनही त्यांना डोस मिळत नसल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर पहिल्या डोससाठी देखील नागरिकांची ओरड सुरू आहेत. महापालिका प्रशासनाचे Aurangabad Municipal Corporation मात्र केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या लसींच्या साठ्याकडे डोळे लागले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे लसींचे मुबलक प्रमाणात डोस मिळत नसल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. महापालिकेने आत्तापर्यंत ५ लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला असला तरी त्यात दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र केवळ सव्वा लाखांच्या घरात आहे. आठवडाभरासाठी किमान एक लाख डोस मिळाव्यात अशी महापालिकेची Aurangabad मागणी आहे.aurangabad residents run for corona vaccination, still many in waiting glp88

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी

पण केवळ १० ते १५ हजार लसी दिल्या जात आहेत. सोमवारी रात्री तर पाच हजार लसी मिळाल्या होत्या. महापालिकेने दररोज १५ ते २० हजार लसीकरण करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. पण लसींचा साठा नसल्याने लसीकरणात वारंवार व्यत्यय येत आहे. १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्या अद्याप कायम आहेत. कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे केल्यानंतर महापालिकेकडे लसीचा साठा होता. त्यानुसार गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसीकरण करण्यात आले. आता दुसरा डोससाठी वेटिंगवर असणाऱ्यांची संख्या प्रत्येक दिवसी १० ते १५ हजारांनी वाढत आहे. बुधवारचा आकडा ५५ हजारांच्या घरात होता. पाच हजार लसी मिळत असताना त्या ५५ हजार नागरिकांना कशा देणार? या विवंचनेत प्रशासन आहे.

हेही वाचा: सुखद! पाच महिन्यानंतर महिलेला मिळाले चोरीला गेलेले मंगळसूत्र

पहाटेपासूनच केंद्रावर रांगा

दुसऱ्या डोसचे ८४ दिवस संपलेले नागरिक सध्या हवालदिल आहेत. अनेक जण पहाटे पाच वाजेपासूनच लसीकरण केंद्रावर टोकन घेण्यासाठी रांगेत थांबत आहेत. उशिरा केल्यास टोकन मिळणार नाही म्हणून, तब्बल पाच तास नागरिक केंद्रावर बसून राहत आहेत.

पोलिस बंदोबस्त मिळेना

लसीची संख्या कमी व नागरिकांची गर्दी हे चित्र सर्वच केंद्रांवर आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रांगेत गोंधळ होत आहे. टोकन वाटप संपल्यानंतर रांगेतील उर्वरित नागरिक महापालिका कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत आहेत. अनेक जण आम्हाला लस हवी, अन्यथा येथून जाणार नाही, अशी भूमिका घेत आहेत. त्यांची समजूत काढताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक केंद्रासाठी पोलिस बंदोबस्त मागितला आहे. काही केंद्रावर पोलिस येत आहेत तर अनेक ठिकाणी दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: बीडचे भूमिपुत्र विजय राठोड जालन्याचे नवे जिल्हाधिकारी

१० लाख लसीकरणाचे उद्दिष्ट

शहरात १८ वर्षावरील नागरिकांची संख्या अंदाजे १० लाख एवढी असल्याचे मानले जात आहे. त्यानुसार महापालिकेला २० लाख डोसची गरज आहे.

कोव्हॅक्सीन लसीचा संपला साठा

कोव्हिशील्ड लसीसोबतच आता कोव्हॅक्सीन लसीचा साठा संपला आहे. महापालिकेने कोव्हॅक्सीन लसीसाठी तीन केंद्र सुरू केले होते. त्याठिकाणी पहिला व दुसरा डोस दिला जात होता.

loading image