esakal | पर्यटनासाठी हवी नवीन 'कनेक्टिव्हिटी'

बोलून बातमी शोधा

कनेक्ट.jpg

-विमानसेवा, रेल्वेसेवा विस्तारण्याची गरज 
-कोरोना प्रभाव कमी झाल्यानंतर आहेत अपेक्षा 

पर्यटनासाठी हवी नवीन 'कनेक्टिव्हिटी'
sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : पर्यटनाच्या दृष्टीने विमानाची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे मार्गाची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. औरंगाबादेतून विमानसेवा आणि रेल्वेसेवेवर मर्यादा असल्याने पर्यटनावर परिणाम झाला आहे. असे असले तरीही येत्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी होताच पुन्हा पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांचा वारसा लाभलेल्या औरंगाबादकडे पर्यटनाचा मोठा ओढा असतो. मात्र, एअर कनेक्टिव्हिटी आणि रेल्वेमार्गाचा अभाव असल्याने या भागाकडे येण्यासाठी पर्यटकांना वैयक्तिक वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अद्ययावत विमानतळ 
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ तब्बल ५५७ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात आहे. विमानतळाची २.२७ किलोमीटर अंतराची धावपट्टी आहे. तीस-चाळीस वर्षांची गरज लक्षात घेऊन विमानतळाचे विस्तारीकरण झालेले आहे. गेल्या वर्षी धावपट्टीचे अद्ययावतीकरण करण्यात आलेले आहे. सध्या चिकलठाणा विमानतळावरून हजला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी जेद्दासाठी थेट विमानाचे उड्डाण होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


पाठपुराव्याला यश 
विमानतळाची तोकडी सेवा असल्याने गेल्यावर्षी येथील व्यापारी, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर तब्बल १४ विमाने सुरू झाली. लॉकडाउनपूर्वी बेंगळुरूसाठी स्पाईस जेट व इंडिगो एअरलाइन्सची दोन विमाने होती. दिल्लीसाठी स्पाईस जेट, एअर इंडिया आणि इंडिगो अशी तीन विमाने होती. हैदराबासाठी इंडिगो, स्पाईस जेट आणि ट्रुजेट अशी तीन विमाने होती. अहमदाबादसाठी ट्रुजेट आणि स्पाईस जेट अशी दोन विमाने होती. मुंबईसाठी एअर इंडिया व इंडिगो अशी दोन आणि उदयपूरसाठी एक अशा १४ विमानांची सेवा सुरू होती. लॉकडाउननंतर एअर इंडियाचे मुंबई तसेच एअर इंडिगो आणि इंडिगोची दिल्ली तसेच हैदराबादसाठी इंडिगो अशी चार विमाने सुरू झाली आहेत. 

रेल्वे विस्तारावर लक्ष देण्याची गरज 
दक्षिण-मध्य रेल्वेच्या उत्पादनात टॉप-२० मध्ये असलेले रेल्वेस्थानक औरंगाबाद आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकाने दक्षिण-मध्य रेल्वेच्या यादीमध्ये वर्षभरात तब्बल ७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. असे असतानाही औरंगाबादच्या रेल्वे विकासाकडे मात्र दुर्लक्ष आहे. सध्या मुंबई जाण्यासाठी सिकंदराबाद- मुंबई (देवगिरी एक्स्प्रेस), नागपूर-मुंबई (नंदीग्राम एक्स्प्रेस), नांदेड- मुंबई (तपोवन एक्स्प्रेस), जालना- दादर (जनशताब्दी एक्स्प्रेस) या चारच गाड्यांवर रेल्वेप्रवाशांचा भार आहे. त्यामुळेच रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हे होणे गरजेचे

  • औरंगाबाद- मुंबई नवीन रेल्वे सुरू व्हावी 
  • औरंगाबाद- चाळीसगाव मार्ग पूर्ण करावा 
  • औरंगाबादेत पीटलाईन सुरू करण्याची गरज 
  • औरंगाबाद ते नागपूर एक्स्प्रेस सुरू करावी 
  • नांदेड - मुंबई नवीन रेल्वे सुरू करा 
  • मनमाड-मुदखेड दुपदरीकरणाचे काम हाती घ्यावे 
  •  विद्युतीकरणाचे रखडलेले काम हाती घ्यावे 

(संपादन-प्रताप अवचार)