esakal | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; आडुळ शिवारातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

apghat 1.jpg

सलग दोन दिवस सुट्टी असल्याने गावाकडे जात असलेल्या रामेश्वर बाबुलाल लोणे यांच्यावर काळाने घाला घातला. औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) बायपासवर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाने त्यांना उडविले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; आडुळ शिवारातील घटना

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडुळ (औरंगाबाद) : पाठीमागून अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) बायपासवर शुक्रवारी (ता.१५) रोजी राञी बारा वाजेच्या सुमारास घडली. अपघातस्थळी कोणी नसल्याचा फायदा घेत दुचाकीला उडविणारा वाहन चालक फरार झाला.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

रामेश्वर बाबुलाल लोणे (वय ४६) रा. चुरमापुरी (ता.अंबड) हे औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत कायमस्वरुपी नौकरीला होते. शनिवारी स्वातंञ्य दिवस व रविवारची सुट्टी असल्याने ते शनिवारी राञी दुचाकी क्रमांक एमएच २१ बीजे ५४३५ ने गावाकडे निघाले होते. दुचाकी आडुळ शिवारातील बायपास मार्गावर येताच दुचाकीला पाठीमागून येणारया एका अज्ञात वाहनाने जोराची धडक देवून पंचविस ते तिस फुटापर्यंत फरफटत नेल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजुला असलेल्या लोखंडी सरंक्षण कंपाऊंडला जावुन धडकली. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

यात दुचाकीस्वार रामेश्वर लोणे दुर फेकल्या जावुन त्यांचा मृत्यु झाला. अपघाताची माहिती मिळताच आडुळ येथील १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. अस्लम सय्यद, चालक सय्यद नासेर यांनी घटनास्थळी धाव घेवुन जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

येथील वैद्यकिय अधिकारी यांनी तपासुन मयत घोषित केले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली. पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुधीर ओव्हळ, फेरोज बरडे करीत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 

loading image