esakal | का होत आहेत परीक्षेच्या काळात भरारी पथकावर हल्ले... वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad - Why are heavy squad attacks during the exam?

दहावी, बारावीच्या भरारी पथकावरच टारगटांची करडी नजर! 
उपद्रवी केंद्रांसमोर केली जातेय दमदाटी, हल्ल्याचेही प्रकार होत असल्यामुळे परीक्षेच्या कालावधीत नेमण्यात आलेले भरारी पथकच दहशतीमध्ये आहे

का होत आहेत परीक्षेच्या काळात भरारी पथकावर हल्ले... वाचा

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद - दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार घडू नयेत म्हणून शिक्षण विभाग व शिक्षण मंडळाकडून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येते; परंतु सध्या जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या भरारी पथकावरच संक्रांत आली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात फिरणाऱ्या या भरारी पथकावरच काही उपद्रवी लोकांकडून हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे आता भरारी पथकच दहशतीमध्ये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
परीक्षेदरम्यान कॉपीसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षकांकडूनच खतपाणी घालण्यात येत असल्याचे प्रकार उघड होत आहेत. जिल्ह्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर पुण्या-मुंबईचे परीक्षा संस्थाचालक आणि केंद्र संचालकांच्या सहकार्यानेच कॉपीयुक्त परीक्षा देत असल्याचे प्रकार सुरू आहेत. सोमवारी (ता. दोन) फर्दापूर (ता. सोयगाव) येथील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेचा बायोलॉजी विषयाचा पेपर सुरू होता. 

वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा

यावेळी भरारी पथक केंद्रावर पोचताच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातच अधिकाऱ्यांच्या डोक्यावर कॉप्यांचा पाऊस पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात गाईड, नवनीत, पॉकेट अपेक्षित गाईड वर्गात सापडले. त्यामुळे संपूर्ण पेपर होईपर्यंत भरारी पथकाने तेथेच ठाण मांडले. त्यामुळे उर्वरित वेळेत कॉपीचा प्रकार होऊ शकला नाही. म्हणून बाहेर उभ्या असलेल्या पालकांमध्ये गोंधळ सुरू झाला. पैसे घेऊन परजिल्ह्यांतून प्रविष्ट झालेले आणि ऐन परीक्षेवेळी पैसे देऊन पास होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या सेटिंगचा बट्ट्याबोळ झाल्याने आक्रोश वाढला होता. 

आश्चर्य वाचा -  आम्ही अंभईचे, निघाले मुंबईचे... बारावीच्या परीक्षेतील प्रकार  

यावेळी काही उपद्रवी लोक बाहेर भरारी पथकाची वाट पाहत थांबलेले असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिस परीक्षा केंद्रावर पोचेपर्यंत भरारी पथकातील अधिकाऱ्यांना एका वर्गखोलीत ठेवले. त्यानंतर बंदोबस्तात भरारी पथकाला शहरापर्यंत सुखरूप पोचविण्यात आले. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात दबाव आणि दमदाटीचा वापर परीक्षा केंद्रावर होत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले असून याची संपूर्ण माहिती विभागीय शिक्षण मंडळास देण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. परीक्षा संपल्यानंतर तदर्थ समितीसमोर हे प्रकरण ठेवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभाग व बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हे ही वाचा...   अडगळीच्या वर्गखोलीत सापडली  रसायनशास्त्राची प्रश्‍नपत्रिका!  
 
याआधीचे प्रकार 
बारावी बोर्ड परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाळूज, रांजणगाव शेणपुंजी येथील परीक्षा केंद्रावर शिक्षकच विद्यार्थ्याचा पेपर सोडवत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने तेथील केंद्र संचालकांसह अन्य चार ते पाचजणांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर खुलताबाद तालुक्यातील केंद्रावर शिक्षकाकडून माऊथ कॉपीचा प्रकार समोर आल्याने त्यांचीही बोर्डाकडून सुनावणी होईल. तसेच नागद येथील केंद्राच्या शंभर मीटर परिसरात दोन ते तीन अज्ञात व्यक्ती बसून असल्याचे आढळले. त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला. 

loading image