झेपीच्या शाळेची मुले लय हुशार! जर्मनीतील दुतावासाशी साधला संवाद

जर्मन भाषा का शिकावी व ती शिकण्यास किती सोपी आहे. आणि मराठी भाषा व जर्मन भाषेतील साम्य तसेच इंग्रजी भाषेपेक्षा जर्मन भाषा सोपी आहे.
Aurangabad News
Aurangabad Newsesakal

लोहगाव (जि.औरंगाबाद) : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त पैठण तालुक्यातील जायकवाडी नाथसागर प्रकल्पग्रस्त तारूपिंपळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (Zilla Parishad School) इयत्ता सातवी व आठवीतील विद्यार्थी, विद्यार्थिंनी, शिक्षकांनी थेट जर्मनीच्या भारतीय वाणिज्य दुतावासाशी सोमवार (ता.१८) ग्लोबल महाराष्ट्रमध्ये (Global Maharashtra) संवाद साधला. जर्मनीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील नांदेड येथील मराठी आधिकारी डॉ. सुयश चव्हाण यांनी सकाळ माध्यम समूहाच्या सहभागातून ग्लोबल महाराष्ट्र या उपक्रमात राज्यातील शाळांना जोडणे, मार्गदर्शन (Aurangabad) करण्यासाठी जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त जर्मनीच्या म्युनिच येथील भारतीय दुतावासात (Indian High Commission In Germany) व्हिडीओ काॅन्फरन्सिंग आयोजित केली होती. यात जायकवाडी धरणग्रस्त पुनर्वसित तारूपिपंळवाडी शाळेतील सातवी व आठवीचे विद्यार्थी तेजस थोटे, अजिंक्य थोटे, प्रद्मुन भुजबळ, कोमल कणसे, सायली नजन, नंदिनी कणसे, शिक्षक सतीश सावंत, रविंद्र लाटे यांनी सहभाग घेतला. यावेळी भारतीय परराष्ट्र सेवेत (आयएफएस) सेवेत मुलांनी का यावे व विद्यार्थ्यांनी काय करावे याविषयी डाॅ. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

Aurangabad News
शेतातील नुकसानीचे दुःख अनावर,तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

तसेच जर्मन भाषा का शिकावी व ती शिकण्यास किती सोपी आहे. आणि मराठी भाषा व जर्मन भाषेतील साम्य तसेच इंग्रजी भाषेपेक्षा जर्मन भाषा सोपी आहे. जर्मन भाषा ही ज्ञानाचे भांडार आहे आणि ती तुम्हाला आंतरराष्ट्रीयस्तरावर टिकवून ठेवण्यासाठी कशी उपयुक्त आहे, यावर केदार जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याबरोबर विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात भाषा शिकण्यास अडचण आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले. पैठण तालुक्यातून एकमेव तारूपिंपळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट विदेशात संवाद साधल्याबदल लोहगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिकांनी मुख्याध्यापक सतीश सावंत, विद्यार्थी, पालक, सकाळ माध्यम समूहाचे आभार मानले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com