मिनी मंत्रालयाच्या ऑनलाईन सभेत होणार ऑफलाईन विषयावर काथ्याकूट !

zp office.jpg
zp office.jpg

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या (मिनी मंत्रालय) स्थायी समितीची सभा शुक्रवारी (ता.२१) दुपारी एक वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. ऑनलाईन होणाऱ्या या सभेत मात्र विविध ऑफलाइन विषयावर चर्चा झडून ठराव मंजुर किंवा ना मंजुरीची मोहोर लावली जाणार आहे. तसेच चाळीसगाव येथील एका कंत्राटदारास केलेल्या कामाच्या मुदतबाह्य  झालेल्या ठेवी प्रदान करण्याचा प्रस्ताव देखील या सभेत सभागृहासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा   
  
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या या सभेत खुलताबाद तालुक्यातील येसगाव नंबर १ ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून मौजे येसगाव नंबर २ अशी नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा ठराव देखील आगामी स्थायी समिती समोर ठेवण्यात येणार आहे. ग्रामपंचायत येसगाव नंबर १ चे विभाजन करू नव्याने येसगाव नंबर २ येथे नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती खुलताबाद  सभेसमोर ठेवला आहे. 

नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी २००४ च्या शासन निर्णयाप्रमाणे शासनाने स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत निकष ठरवून दिलेले आहेत. सदरील निकषानुसार येसगाव नंबर २ ग्रामपंचायत स्थापनेसाठी गावाला महसुली दर्जा असणे आवश्यक आहे. सदर गाव खुलताबाद तालुक्यातील  गिरजा मध्यम प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेले गाव आहे. शासन निर्णयानुसार या गावाची लोकसंख्या ३५० पेक्षा जास्त असेल तर त्या गावात नवीन ग्रामपंचायत देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. 

ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन दोन वर्षापर्यंत ग्रामपंचायतीचे विभाजन करता येत नाही. मात्र ग्रामपंचायत येसगाव नंबर एकची निवडणूक होऊन दोन वर्षे पूर्ण झालेल्या आहेत. सदरील गावास महसुली दर्जा प्राप्त झालेला आहे. सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग खुलताबाद यांच्या पत्रानुसार पुनर्वसित गाव मौजे तासगाव दोन या गावातील अंतर साडेसात किलोमीटर आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव शासन निकषाप्रमाणे स्थायी समितीसमोर मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे. 

बाह्यठेविंचे देयके देण्याचा प्रस्ताव  
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विविध कामे केलेल्या चाळीसगाव येथील ठेकेदार बी.पी.पुनसी यांना (व्यपगत) मुदतबाह्य झालेली एफडीच्या ठेवीची देयके तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असल्याने त्यास मान्यतेसाठी स्थायी समिती सभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलेल्या विषयांमध्ये विषय क्रमांक तीन नुसार मुदतबाह्य ठेवी प्रदान करण्याच्या प्रस्तावामध्ये ए. डी. पवार या कंत्राटदाराला आरापूर, खडक नारळा, वाघलगाव या रस्त्यांच्या मजबुतीकरण करणे व डांबरीकरण करणे या कामाच्या ठेवी तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे प्रदान करण्यासाठीचा प्रस्ताव सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना रामराव शेळके यांच्या उपस्थितीत ही सभा होणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, स्थ्यायी समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित  राहणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com