esakal | औरंगाबादचे बामु ३१ मार्चपर्यंत बंद

बोलून बातमी शोधा

Aurangabad News Dr. Bamu's Registrar Jayashree Suryavanshi

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर ३१ मार्चपर्यंत पुर्णतः बंद ठेवण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. या काळात प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ते प्रशासकीय काम करावे, या संदर्भात ३१ मार्च रोजी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे कळविण्यात आले.

औरंगाबादचे बामु ३१ मार्चपर्यंत बंद

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर ३१ मार्चपर्यंत पुर्णतः बंद ठेवण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. या काळात प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ते प्रशासकीय काम करावे, या संदर्भात ३१ मार्च रोजी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे कळविण्यात आले.

विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागातर्फे बुधवारी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. आधी २५ मार्चपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्यात येणार होते. ती मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. या काळात विद्यापीठाच्या औरंगाबाद मुख्य परिसर येथील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद उपपरिसर व मॉडेल कॉलेज, घनसावंगी हेही या काळात पुर्णतः बंद राहील.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोना विषाणुचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव/प्रसार विद्यापीठ परिसर, वसतिगृहे, कार्यालयामध्ये होऊ नये तसेच प्राध्यापक, अधिकारी,कर्मचारी, विद्यार्थी यांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक व तातडीची उपाययोजना म्हणून  सदर निर्देश दिले गेले आहेत. वैद्यकीय विभाग, तातडीची सेवा देणारा विभाग, सुरक्षा विभाग, इत्यादींच्या विभागप्रमुखांना ज्यांची सेवा अत्यावश्यक वाटत असल्यास त्याबाबतीत त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आपत्कालीन परिस्थिती म्हणुन हे आदेश लागू केले आहेत. प्राध्यापकांनी देखील ३१ मार्चपर्यंत घरी बसून काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या संदर्भात ३१ मार्च रोजी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख यांनी आपल्या अधिनस्थ कर्मचा-यांच्या सदर परिपत्रक निर्देशनास आणून द्यावे तसेच सर्व संबंधीतांनी याची नोंद घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. असे कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी कळवले आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा