esakal | औरंगाबादचा रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर, जिल्ह्यात ३६ हजार ६०९ कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९८ टक्क्यांवर पोचले आहे.

औरंगाबादचा रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर, जिल्ह्यात ३६ हजार ६०९ कोरोनामुक्त

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९८ टक्क्यांवर पोचले आहे. आतापर्यंत ३६ हजार ६०९ जण बरे झाले आहेत. शनिवारी (ता. ३१) एकूण ९८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ हजार १४१ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ७१ जणांचा मृत्यू झाला असून एकूण ४६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी घाटी रुग्णालयात अंबेलोहळ (ता. गंगापूर) येथील ७० वर्षीय महिला कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात


अँटीजेन टेस्टमध्ये महापालिका हद्दीतील २५ व ग्रामीण भागातील १६ रुग्ण आढळले. शनिवारी १८५ जणांना सुटी झाली. यात शहरातील १२१ व ग्रामीण भागातील ६४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ३६ हजार ६०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या)
पोलिस कॉलनी, मिलकॉर्नर (१), विद्युत कॉलनी, बेगमपुरा (१), नवजीवन कॉलनी (३), आलमगीर कॉलनी (१), औरंगपुरा (१), नारळीबाग (१), कासलीवाल मार्बल, बीड बायपास (१), शिवाजीनगर (२), एन चार सिडको (१), हनुमाननगर (१), मिटमिटा (१), कांचनवाडी (१), जालननगर (२), अन्य (१), स्वप्ननगरी (१), ज्योतीनगर (१), मल्हारनगर, सातारा परिसर (१), गजानननगर, गारखेडा (१), विष्णूनगर (१), म्हाडा कॉलनी (२), सातारा परिसर (२), विठ्ठलनगर (१), अयोध्यानगर (३), एन तेरा, भारतनगर (१), एन आठ, सिडको (७), गारखेडा (१), एन नऊ, श्रीकृष्णनगर (१), लक्ष्मी कॉलनी (१), घाटी परिसर (१), संजयनगर (१), मनीषनगर (१), एन अकरा हडको (१), एन वन सिडको (१)

आरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे


ग्रामीण भागातील बाधित
टाकळी, कन्नड (२), विष्णूनगर, कन्नड (१), दत्तनगर, रांजणगाव (१), जिकठाण (१), दारेगाव, खुलताबाद (१), लासूर (१), वाळूज एमआयडीसी (२), पळसखेडा (१), औरंगाबाद (२), गंगापूर (२), वैजापूर (७), पैठण (५)
 

कोरोना मीटर
------------
उपचार घेणारे रुग्ण : ४६१
बरे झालेले रुग्ण : ३६६०९
एकूण मृत्यू : १०७१
----------
आतापर्यंतचे बाधित : ३८,१४१


संपादन - गणेश पिटेकर