बामुतील बंदला तिसऱ्यांदा मुदतवाढ

Aurangabad News Dr. Bamu's Registrar Jayashree Suryavanshi
Aurangabad News Dr. Bamu's Registrar Jayashree Suryavanshi

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येत्या १४ एप्रिलपर्यंत संपुर्णतः बंद राहणार आहे. आधी २२ ते २५ मार्च, नंतर ३१ मार्चपर्यंत आणि आता १४ एप्रिलपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे. तसे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत.

विद्यापीठाच्या आस्थापना विभागातर्फे सोमवारी (ता. ३०) दुपारी प्रसिद्धीपत्रक काढण्‍यात आले आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन येत्या १४ एप्रिलपर्यंत विद्यापीठ परिसर पुर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात विद्यापीठ औरंगाबाद मुख्य परिसर येथील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद उपपरिसर, समाजकार्य महाविद्यालय व मॉडेल कॉलेज, घनसावंगी हेही बंद राहील, असे कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याकाळात सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ते प्रशासकीय काम करावे, असेही निर्देशही दिले आहेत. कोरोना विषाणुचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव विद्यापीठ परिसर, वसतिगृहे, कार्यालयामध्ये होऊ नये. अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांना त्याचा संसर्ग होऊ नये. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख यांनी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या सदर परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे. तसेच सर्व संबंधितांनी याची नोंद घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच सर्व संलग्नित महाविद्यालये, विद्यार्थी व सर्व संबधितांनी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आढावा घेऊन पुढील निर्णय
वैद्यकीय विभाग, तातडीची सेवा देणारा विभाग, उद्यान विभाग, सुरक्षा विभाग, इत्यादींच्या विभागप्रमुखांना ज्यांची सेवा अत्यावश्यक वाटत असल्यास त्याबाबतीत त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. शिक्षकांनी तोपर्यंत घरी बसून काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या संदर्भात १४ एप्रिलला आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com