भाविकांचे श्रद्धास्थान हेरंब गणपती

दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास असलेले पात्रुड (ता.माजलगाव) येथील तीन मजली हेरंब गणपती मंदिर
beed ganeshotsav
beed ganeshotsav sakal

माजलगाव साधारणतः दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास असलेले पात्रुड (ता.माजलगाव) येथील तीन मजली हेरंब गणपती मंदिर आहे. पात्रुड ग्रामस्थांच्या दिवसाची सुरुवातच या गणेश दर्शनाने होते. प्रत्येक दिवशी अभिषेकाची परंपरा या मंदिराला असून गणेशोत्सवात दैनंदिन विधिवत पुजा केली जाते. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

पुरातन असलेल्या या मंदिराचा गाभारा वीस फुटांच्या दगळी शिळांपासून बनविण्यात आलेला असून भीमशिळा असे या शिळांना संबोधले जाते. २०१८ मध्ये ग्रामस्थांनी जिर्णोद्धार करत हेरंब गणपती असे नामकरण केले. तर ऋग्वेद कालात गोदावरी नदीकाठावर पाथरी येथे मुदगल ऋषींचा आश्रम होता. त्यांचा प्रल्हाद नावाचा शिष्य गुरुकुलातील शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर तीर्थाटन करत असताना या गणपतीची स्थापना केल्याची आख्यायिका आहे.

दरम्यान गावाच्या मधोमध असलेले हेरंब गणपती मंदिरात गुढीपाडव्याला हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. दरदिवशी याठिकाणी गणपतीचा अभिषेक देखील केला जातो. ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात गणेशोत्सवात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते.

कसे जायचे ?

माजलगाव शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर पात्रुड येथे हेरंब गणपतीचे मंदिर आहे. खामगाव - पंढरपूर या पालखी महामार्गावरून अवघ्या एक किमी. अंतरावर मंदिर आहे. बसने किंवा दुचाकीने सहज येथे पोचता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com