
शिवसेना नेते आणि खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद शेख हा हिबानामामुळे चर्चेत आला होता. त्याच्या नावे करण्यात आलेल्या जमिनीमुळे वादही निर्माण झाला होता. आता भुमरेंच्या चालकाला आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आलीय. त्याला हिबानामातून मिळालेल्या जमिनीची किंमत किती असा प्रश्न उपस्थित होत होता. छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून जमिनीचं शासकीय मूल्य काढण्यासाठी आता महसूल विभागाला एक पत्र दिलंय. यानंतर जमिनीच्या किंमतीची माहिती समोर आलीय.