छत्रपती संभाजीनगर - भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष निवडीचा गुंता वाढत चालला आहे. स्थानिक नेत्यांमध्ये पदासाठी चर्चेत असलेल्या कुणा एकाच्या नावावर एकमत होईना, असे चित्र आहे. दरम्यान, यावरून मुंबईत स्थानिक नेत्यांमध्ये वाद झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.