esakal | वार्डातील समस्यांमुळे भाजपचे उपोषण, कचरा वाहनाची केली व्यवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

सिडको एन-७ परिसरातील वार्ड ४१ व ४२ मधील विविध समस्यांकडे महापालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. समस्या सोडविण्यासाठी भाजपचे शहर उपाध्यक्ष गणेश नावंदर यांनी शनिवारी (ता.२६) लाक्षणीक उपोषण करीत त्या समस्या महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या.

वार्डातील समस्यांमुळे भाजपचे उपोषण, कचरा वाहनाची केली व्यवस्था

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : सिडको एन-७ परिसरातील वार्ड ४१ व ४२ मधील विविध समस्यांकडे महापालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. समस्या सोडविण्यासाठी भाजपचे शहर उपाध्यक्ष गणेश नावंदर यांनी शनिवारी (ता.२६) लाक्षणीक उपोषण करीत त्या समस्या महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या. दोन्ही वार्डातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, वार्ड क्रमांक ४२ अयोध्यानगरात नियमितपणे साफसफाई करीत कचरा संकलन करण्यात यावा. मुख्य रस्ते सिमेंटचे करावेत, ड्रेनेज दुरुस्ती करावी, डि.पी स्थलातंरीत करावी, या मागण्या मांडण्यात आल्या. उपोषणाची दखल घेत महापालिकेने कचरा संकलनासाठी घंटागाडी उपलब्ध करून दिली.

तसेच बाजारपेठेतील डिपीही स्थालांतरचे कामही करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन महापालिकेचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी नावंदर यांना दिले. त्यानंतर आमदार अतुल सावे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. अनिल मकरिये, रेखा पाटील, शिवाजी दांडगे, नितीन खरात, अरुण पालवे, लक्ष्मीकांत थेटे, विलास कोरडे, राहुल खरात, राजेश मीरकर, गणेश जोशी, सतीष खेडकर, प्रदीप ठाकरे उपस्थित होते.

Edited - Ganesh Pitekar

loading image