esakal | कोरोनाविरुद्धच्या भाजप महिला मोर्च्याची घरगुती 'मास्क मूव्हमेंट'
sakal

बोलून बातमी शोधा

BJP mahila Morcha running Mask Movement Aurangabad News

महिला मोर्च्याने घरगुती मास्क बनविण्याचे अभियान हाती घेतले आहे. आतापर्यंत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, केरळ, ओडिशा आदी प्रमुख राज्यांमध्ये मास्क बनविण्याचे काम चालू झाले आहे. महाराष्ट्रातही ते काम चालू होत आहे,

कोरोनाविरुद्धच्या भाजप महिला मोर्च्याची घरगुती 'मास्क मूव्हमेंट'

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: कोरोना विषाणुचा वाढता प्रदुर्भाव पहता या संकटावर मात करण्यासाठी केद्र सरकरतर्फे विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. याच काळात आपल्या कुटुबांची काळजी घेण्यासाठी भाजप महीला मोर्चातर्फे पुढाकार घेतला आहेत. कोरोनाचा धोका पुढील काही महिनेतरी राहू शकतो, हे लक्षात घेऊन महिला मोर्चाने घरगुती मास्क बनविण्याचे देशव्यापी अभियान (मास्क मूव्हमेंट) हाती घेतले आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक मास्क बनविले गेले असल्याचे महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. 

"कोरोनाच्या वैश्विक संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी १४ एप्रिल पर्यत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यास जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याने कोरोनावर मात करण्याच्या लढाईला बळकटी आली आहे. लॉकडाऊननंतरही कोरोनाच्या संसर्गाचा धोका काही महिनेतरी राहू शकतो, हे लक्षात घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सूचनेवरून महिला मोर्च्याने घरगुती मास्क बनविण्याचे अभियान हाती घेतले आहे. आतापर्यंत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, केरळ, ओडिशा आदी प्रमुख राज्यांमध्ये मास्क बनविण्याचे काम चालू झाले आहे. महाराष्ट्रातही ते काम चालू होत आहे," असे रहाटकर यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये हे काम चालू झाल्याचे रहाटकरांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या अभियानाविषयी विजया रहाटकर म्हणाल्या,"मास्कचे दोन प्रकार आहेत. डिस्पोजेबल (सर्जिकल) आणि घरगुती बनविलेले. सर्जिकल मास्क हे प्रामुख्याने डॉक्टर्स व रूग्णालयातील कर्मचारयांना लागतात. पण सामान्य व्यक्तींना घरगुती बनविलेले मास्कदेखील पुरेसे असतात. शंभर टक्के कापसांपासून बनविलेले, घरातील जुन्या चांगल्या कपड्यांपासून बनविलेले हे मास्क अगदी स्वस्तात बनविले जाऊ शकतात. स्वच्छ धुवून त्याचा फेरवापरही करता येईल असे हे मास्क आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

याउलट सर्जिकल मास्क महागडे असतात आणि ते एकदाच वापरता येतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जर ऐंशी टक्के जनतेने घरगुती मास्कचा प्रभावी वापर केल्यास कोरोनाचा धोका संपूर्णत टळेल. हे सगळे लक्षात घेऊन महिला मोर्च्याने हे अभियान हाती घेतले आहे. हे मास्क स्वत:च्या कुटुंबासाठी बनविले जाऊ शकतात. उरलेले मास्क अत्यंत स्वस्त किंमतीत उपलब्ध होऊ शकतात.९ इंच बाय ७ इंच आणि सात इंच बाय पाच इंच या आकाराचे हे मास्क असतील. मास्क बनविण्यात येणारे साहित्य मात्र उकळत्या पाण्यामध्ये गरम करणे गरजेचे आहे आणि त्याची नियमित निगा राखणे गरजेचे आहे, असेही विजया रहाटकर म्हणाल्या. 
 

loading image