esakal | शहरातील हिंदूंचे भाजपच रक्षण करणार-चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

BJP will protect Hindus in the city

सत्तेसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणारी शिवसेना शहरात हिंदूंचे रक्षण कसे करणार, असा प्रश्‍न उपस्थित करत, भाजप हिंदूंचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे

शहरातील हिंदूंचे भाजपच रक्षण करणार-चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. घटनेत तरतूद नसतानाही शिवसेना सरकारने मुस्लिमांना पाच टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. सत्ता टिकवण्यासाठी राज्यात नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सत्तेसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणारी शिवसेना शहरात हिंदूंचे रक्षण कसे करणार, असा प्रश्‍न उपस्थित करत, भाजप हिंदूंचे रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता.२९) कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले 

हेही वाचा- तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेण्यात आला. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार सुजितसिंग ठाकूर, विजय पुराणिक, भाऊराव देशमुख, डॉ. भागवत कराड, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, विजया रहाटकर, संजय केणेकर, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, श्रीकांत जोशी, ज्ञानोबा मुंडे उपस्थित होते.

हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका

श्री. पाटील म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकारने आर्थिक दुर्बलांना यापूर्वीच दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्यात मुस्लिमही येतात; परंतु राज्यातील शिवसेनेला सत्ता टिकवायची असल्यामुळे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात. 

हे वाचलंत का? - औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे

भाजपची सत्ता आल्यास महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहे उभारली जातील, वृद्धांसाठी वॉर्डा-वॉर्डात विरंगुळा केंद्रे उभारली जातील, आता आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून शिवसेना ही निवडणूक लढणार आहे. हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही पाटील यांनी दिले. 

हेही वाचा-  Video : भाजपला संधी द्या, औरंगाबादचे चित्रच बदलू : चंद्रकांत पाटील

मेळाव्यात मानापमान नाट्य 
व्यासपीठामागे लावण्यात आलेल्या पोस्टरवर प्रदेशाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांची छायाचित्र होती. परंतु केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व आमदार बागडे यांची छायाचित्रे नव्हती. त्यामुळे दानवे आणि बागडे समर्थक नाराज झाले. ही बाब ऐनवेळी लक्षात आल्यानंतर एकच धावाधाव झाली आणि मेळाव्यात पदाधिकाऱ्यांसमोर हे पोस्टर बदलण्यात आले. 

loading image