esakal | गूड न्यूज...औरंगाबादेत आता फक्त १४ कोरोनारुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबादेत आता फक्त १४ कोरोनारुग्ण

जिल्हा सामान्य रुग्णालय, घाटी रुग्णालय व एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स परिचारीकांसह इतर स्टाफने प्रचंड घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर शहरात आता मोठे आशादायक चित्र निर्माण होत आहे. 

गूड न्यूज...औरंगाबादेत आता फक्त १४ कोरोनारुग्ण

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद - औरंगाबादकरांसाठी आणखी एक चांगली बातमी असुन कोविड -१९ चा संसर्ग झालेल्या ३१ रुग्णसंख्येपैकी आतापर्यंत १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील आठ  जणांना आधीच सुटी मिळाली. सोमवारी (ता. २०)  सहा जणांना सुटी मिळाली आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप देशमुख यांनी सकाळ ला दिली. हे केवळ डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांमुळे शक्य झाले असुन ही आकडेवारी सोमवारी चार वाजेपर्यंतची आहे.

 
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी सात रुग्ण रविवारी (ता. १९) कोरोनामुक्त झाले. तर सोमवारी (ता. २०) चार रुग्ण कोरोनामुक्त झाले. सातपैकी पाचजणांना रविवारी तर सोमवारी सहा जणांना सुटी झाली. त्यांना आता घरी पाठविण्यात आले आहे.


जिल्ह्यात आजपर्यंत ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात तिघांचा मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयात १३ जणांवर उपचार सुरू आहेत. दोघाजणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर घाटीत एका कोरोनाबाधितावर उपचार सुरू आहे. 

शहरातील सिडको एन-चार भागातील अठ्ठावन्नवर्षीय महिला कोरोनामुक्त झाली. या महिलेला बुधवारी (ता.१५) रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शनिवारी (ता.१८) याच महिलेची सातवर्षीय नात कोरोनामुक्त झाली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

विशेष म्हणचे सातारा परिसरातील एकाच कुटुंबातील तिघे कारोनामुक्त झाले. त्यांना मंगळवारी सुटी देण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय, घाटी रुग्णालय व एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स परिचारीकांसह इतर स्टाफने प्रचंड घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर शहरात आता मोठे आशादायक चित्र निर्माण होत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

आता पर्यंतचे कोरोनामुक्त (कंसात सुटीची तारीख)

१) सिडको एन-१ येथील ५९ वर्षीय महिला (२३ मार्च)
२) सिडको एन-४ येथील ५८ वर्षीय महिला   (१५ मार्च)
३) पदमपुरा येथील ४३ वर्षीय डॉक्टर (१९ एप्रिल)
४) सिडको एन-४ येथील सात वर्षीय मुलगी (१८ एप्रिल)
५) आरेफ कॉलनी ४५ वर्षीय महिला (१९ एप्रिल)
६) देवळाई येथील ३८ वर्षीय चालक (१९ एप्रिल)
७) रोशनगेट येथील ३७ वर्षीय तरुण (१९ एप्रिल)
८) पडेगाव येथील ३८ वर्षीय घाटीचा ब्रदर (१९ एप्रिल)

सोमवारी सुटी झालेले कोरोनामुक्त

९) सातारा परिसर येथील २८ वर्षीय महिला (२० एप्रिल)
१०) सातारा परिसर येथील ३० वर्षीय पुरुष (२० एप्रिल)
११) सातारा परिसर येथील ३० वर्षीय पुरुष (२० एप्रिल)
१२) अहबाब कॉलनी येथील २७ वर्षीय महिला (२० एप्रिल)
१३) किराडपुरा येथील २२ वर्षीय तरुण (२० एप्रिल)
१४) आरेफ कॉलनीतील ३८ वर्षीय पुरुष  (२० एप्रिल)

अतीशय चांगला दिवस आज आहे, आम्ही कोरोनामुक्त सहा रुग्णांना सुटी केली. आता शहरात कोवीड-१९ चे १४ रुग्ण आहेत. आतापर्यंत १४ जणांना सुटी देण्यात आली आहे. डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक.  
 

loading image