औरंगाबाद : अल्पवयीन बहिणीवर मावस भावाचा अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

brother abuses younger sister
औरंगाबाद : अल्पवयीन बहिणीवर मावस भावाचा अत्याचार

औरंगाबाद : अल्पवयीन बहिणीवर मावस भावाचा अत्याचार

औरंगाबाद : अल्पवयीन बहिणीवर मावस भावानेच वारंवार अत्याचार करून गर्भवती केले. पीडितेची घाटी रुग्णालयात प्रसूती झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम भावाला बेड्या ठोकल्या.(brother abuses younger sister)

हेही वाचा: औरंगाबादेत युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ,पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

गोलवाडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्याच मावस भावाने वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. तिला पोटदुखीचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी २९ डिसेंबर रोजी घाटी रुग्णालयात हलविले.(Abdominal pain)

हेही वाचा: औरंगाबाद : गुंठेवारीसाठीही ‘वेटिंग’; एजन्सीकडे अडकल्या शेकडो फायली

डॉक्टरांनी तपासणी केली असता पीडिता ही सात महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने सर्वानाच धक्का बसला. पीडितेची सात महिन्याची गरोदर असताना घाटी रुग्णालयात प्रसूती झाली. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मावस भावानेच अत्याचार केल्याचे समोर आले.या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी भावाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी डी. एन.ए.नमुना घेतला असून तो तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top