
औरंगाबादेत युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ,पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
करमाड (जि.औरंगाबाद) : जालना महामार्गावरून गोलटगावकडे जाणाऱ्या जोड रस्त्यावर हसनाबादवाडी शिवारात शुक्रवारी (ता.३१) सकाळी एका तिशीतील युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या युवकाच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमेचे व्रण असल्याने हा घात की अपघात अशी स्थिती असून करमाड पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. शुक्रवारी सकाळी करमाड पोलिसांना (Karmad Police) खबर मिळाली की, एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गोलटगावला जाणाऱ्या रस्त्यालगत बेवारस स्थितीत पडून आहे. करमाड पोलीस ठाण्याचे (Aurangabad) पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. (youth's dead body found in aurangabad, investigation challenge before police)
हेही वाचा: Osmanabad Accident : उस्मानाबादेत मोठा अपघात, कारमधील चौघे जण जागीच ठार
दरम्यान, प्राथमिकदृष्ट्या या युवकाच्या अंगावर ठिकठिकाणी जखमेचे व्रण आढळून आल्याने हा घातपाताचा प्रकार वाटतो. तथापि अधिक माहिती व मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच अधिक बोलणे उचित होईल असे करमाड पोलिसांकडून (Crime In Aurangabad) सांगण्यात आले. तरुणास कोणी ओळखत असल्यास पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे (9823508686), सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील (7350534100), पोलिस नाईक सुनील गोरे (8408075111) अथवा पोलीस ठाण्याच्या 0240262333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन करमाड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
Web Title: Youths Dead Body Found In Aurangabad Investigation Challenge Before Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..