लहान भावाने मोठ्या भावाच्या घराची केली तोडफोड, पैठणमधील घटना

 मुलानीवाडगाव (जि.औरंगाबाद) :  जागेच्या वादातून तोडलेल्या घराचे चित्र.  (छायाचित्र - ज्ञानेश्वर बोरुडे)
मुलानीवाडगाव (जि.औरंगाबाद) : जागेच्या वादातून तोडलेल्या घराचे चित्र. (छायाचित्र - ज्ञानेश्वर बोरुडे)

लोहगाव (जि.औरंगाबाद) : मुलानीवाडगाव (ता.पैठण) (Paithan) येथे सहाण (रिकामी) जागा विक्री देणे-घेण्याच्या व्यवहार कारणावरून लहान भावाने कुंटूंबाच्या मदतीने मोठ्या भावाच्या घराची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (ता.२३) रात्री साडेदहा वाजेदरम्यान घडली आहे. याबाबत बिडकीन पोलिसांकडून (Bidkin) मिळालेली माहिती, अशी की मुलानीवाडगाव येथील शिवनाथ इथापे हे सोमवार रात्री जेवनानंतर आपल्या मित्रांसोबत घराच्या पाठीमागे बसले असताना त्याचा औरंगाबाद (Aurangabad) शहरात राहणारा लहान भाऊ कृष्णा इथापे, पत्नी, मुलगा, मुलगी दोन दुचाकी वाहनाने मुलानीवाडगाव (Crime In Aurangabad) आले असता त्यांच्या सहाण जागा विक्री देणे-घेणे व्यवहाराचा राग मनात धरून दोघा बापलेकाने काही एक न म्हणता घरात घुसून सब्बल, टिकावाच्या साहाय्याने पत्रे उचकवटून भिंती पाडल्या.

 मुलानीवाडगाव (जि.औरंगाबाद) :  जागेच्या वादातून तोडलेल्या घराचे चित्र.  (छायाचित्र - ज्ञानेश्वर बोरुडे)
पोटचा गोळा गेल्याचे बघताच आईने फोडला टाहो, लोक झाले भावूक

घरातील संसारोपयोगी साहित्य, कपाटाची तोडफोड करत, त्यातील पन्नास हजार रूपये काढून घेत माझ्या मुलास मारहाण जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची फिर्याद बिडकीन पोलीस ठाण्यात शिवनाथ इथापे यांनी दिली.त्यावरून ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसाना रात्री या घटनेची खबर मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करून मंगळवार (ता.२४) पैठण न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याचे फौजदार जगदीश मोरे यांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनखाली फौजदार मोरे, हवालदार गोविंद राऊत करित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com