बहिणीला भेटून घरी जाणाऱ्या भावावर काळाची झडप, नाल्यात कोसळून मृत्यू

बहिणीला भेटून गावाकडे जाताना भावाचा...
Accident
AccidentSakal

वाळूज (जि.औरंगाबाद) : बहिणीला भेटून गावाकडे जात असलेल्या ३१ वर्षीय तरुणाची दुचाकी पुलावरून नाल्यात कोसळल्याने गंभीर जखमी होऊन नाका-तोंडात नाल्यातील पाणी गेले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता.२६) रोजी घाणेगाव येथे सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आला. गवळी शिवरा (Gangapur) येथील तोताराम गोविंद गवळी हा वाळूज परिसरातील घाणेगाव येथे बहिणीला भेटण्यासाठी शनिवारी (ता.२५) रोजी आला होता. तो रात्रीच घाणेगाव (Aurangabad) येथून गवळीशिवरा येथे जात होता. अंधारात पुल व नाल्याचा अंदाज न आल्याने तो दुचाकीसह घाणेगाव जवळ असलेल्या स्मशानभूमी शेजारील नाल्याच्या पुलावरून पाण्यात पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. (Brother Died After Visiting Sister In Waluj Area Of Aurangabad)

Accident
Parbhani : परभणीतील भीषण अपघातात नांदेडचे ४ ठार, तर ४ गंभीर जखमी

नाल्यातील पाणी त्याच्या नाकातोंडात गेल्याने तो बेशुद्ध पडला. या अपघाताची माहिती रविवारी (ता.२६) रोजी सात वाजेच्या सुमारास मिळताच बाळू जाधव व लक्ष्मण गवळी यांनी तोताराम गवळी याला घाटीत उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून साडेदहा वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. या प्रकरणी घाटीतुन आलेल्या माहितीवरुन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल दशरथ खोसरे करित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com