समृद्धी महामार्गावर अपघातानंतर पेटली कार, आर्किटेक्चरचा पत्नी अन् मुलीच्या डोळ्यादेखत होरपळून मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर कारने ट्रकला मागून धडक दिल्यानंतर अचानक पेट घेतला. यामध्ये एका ५२ वर्षीय व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Samruddhi Highway Accident

Samruddhi Highway Accident

Esakal

Updated on

समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरमधील जांबरगाव शिवारात भीषण अपघात झाला. ट्रकला मागून धडकल्यानंतर कार जवळपास १०० फूटापर्यंत फरफटत गेली. यानंतर कारला आग लागून ५२ वर्षीय पनव अजमेरा यांचा होरपळून मृत्यू झाला. जांबरगाव शिवारात सोमवारी (ता. १३) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकला मागून धडकल्यानंतर कारने अचानक पेट घेतला. तेव्हा कारमध्ये पवन यांची मुलगी आणि पत्नी होत्या. त्या दोघींना बाहेर काढण्यात यश आलं पण पवन हे गाडीतच अडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. Samruddhi expressway accident

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com