आरटीई प्रवेश निश्‍चितीचे पालकांपुढे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Challenges to Parents RTE Admission Confirmation aurangabad

आरटीई प्रवेश निश्‍चितीचे पालकांपुढे आव्हान

औरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यात पहिल्या फेरीत जिल्ह्यातील ४ हजार १९३ बालकांची निवड करण्यात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्‍चित करण्यासाठी पालकांना २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतू, दहा दिवस उलटून गेल्यानंतरही केवळ ४४६ प्रवेश निश्‍चित झाले आहेत. उरलेल्या तीन दिवसांत ३ हजार ७४७ पाल्यांचे कागदपत्र पडताळणी करुन प्रवेश निश्‍चित करण्याचे आव्हान पालकांसमोर आहे.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षांकरिता औरंगाबाद जिल्ह्यातून १७ हजार ३९३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी निवड प्रक्रियेत ४ हजार १९३ बालकांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतही दिडशेहून अधिक बालके आहेत. २० एप्रिलपर्यंत शाळेत जाऊन या बालकांचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून पालकांना करण्यात आले आहे.

मुदतवाढीची मागणी

प्रवेश निश्चितीसाठी केवळ चार दिवस उरले असताना नऊशेपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. सगल चार दिवस सुट्या आल्या आहेत. त्यानंतर पुढील तीन दिवसांत प्रवेशात फारशी वाढ होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. तर आपल्या परिसरातील नावाजलेल्या शाळेतच पाल्याला प्रवेश मिळावा, हा अट्टाहास असल्याने प्रवेशांची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Web Title: Challenges To Parents Rte Admission Confirmation Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..