Chh.Sambhaji Nagar Fraud: तुम्ही एक लाख द्या;आम्ही पाच लाख देतो! तब्बल ५४ लाखांची...

संगणकावर अनेकांना एक कोटी, दोन कोटींचा परतावा दिल्याची यादी आणि बँकेचे धनादेश दाखविले.
 Chhatrapati Sambhaji nagar
Chhatrapati Sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर - तुम्ही आमच्याकडे केवळ एक लाखाची गुंतवणूक केल्यास दोनच महिन्यात तब्बल पाच लाखांचा परतावा देऊ, असे आमिष दाखवून तिघा भामट्यांनी सहा जणांना तब्बल ५४ लाख २८ हजार ८५८ रुपयांचा गंडा घातला. ही घटना १ जानेवारी ते १७ ऑगस्ट २०२३ दरम्यान नारेगावात घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

राजउद्दीन सिराजउद्दीन मनियार (रा. फातेरा मशिदीजवळ, नारेगाव), शुभम काकासाहेब गावंडे, योगीता ऊर्फ नम्रता शुभम गावंडे (दोघे रा. करोडी), संगीता काकासाहेब गावंडे (रा. सौजन्य नगर, बालाजीनगर), अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

शुभांगी शिवराज धोत्रे (३१, रा. सह्याद्रीनगर, एन-५, सिडको) या फिर्यादी आहेत. त्यांचे ब्युटीपार्लर आहे. आरोपी संगीता गावंडे ही त्यांच्या पार्लरमध्ये मागील सहा महिन्यांपासून येत होती. तिनेच इतर आरोपींची ओळख करून दिली.

एकेदिवशी चौघांनी मिळून शुभांगी धोत्रे यांना भेटायला बोलावले. त्या राजउद्दीनच्या कार्यालयात गेल्या. तेथे आरोपींनी त्यांना आमच्याकडे पैशांची गुंतवणूक केल्यास एक लाखाला दोन महिन्यांत पाच लाख रुपये परतावा देऊ, असे आमिष दाखविले.

 Chhatrapati Sambhaji nagar
Fraud News : बेरोजगार तरुणांची रायगड सुरक्षा मंडळाच्या अधिकार्‍यांकडून फसवणूक

तसेच, संगणकावर अनेकांना एक कोटी, दोन कोटींचा परतावा दिल्याची यादी आणि बँकेचे धनादेश दाखविले. शुभांगी यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. १ जानेवारी २०२३ रोजी एक लाख आणि ४ जानेवारीला २ लाख, असे तीन लाख रुपये त्यांनी आरोपींकडे गुंतवणूक करण्यासाठी दिले.

त्यांना दोन महिन्यांनी म्हणजे, ४ मार्च २०२३ रोजी १५ लाख परतावा मिळणार होता. मात्र, त्यानंतर आरोपींनी शुभांगी यांना ना जास्तीचा परतावा दिला ना मूळ रक्कम परत केली.

 Chhatrapati Sambhaji nagar
Pune Crime News : पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल ५ टन बनावट पनीर जप्त

मागील काही महिन्यांपासून सर्वच गुंतवणूकदार हे आरोपींकडे पैशांचा तगादा लावत आहेत. मात्र, ते प्रत्येकवेळी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेतली, परंतु रोखीत गुंतवणूक केल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी तक्रार घेतली नाही. गुंतवणुकदारांनी न्यायालयात धाव घेतली.

अखेर, न्यायालयाच्या आदेशाने एमआयडीसी सिडको ठाण्यात फसवणूक व एमपीआयडी काद्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक अर्जून राऊत करीत आहेत.

 Chhatrapati Sambhaji nagar
'Nadi ko Jano' अ‍ॅप लॉंच! मिळेल भारतीय नद्यांशी संबंधित माहिती

कुणाची किती झाली फसवणूक?

शुभांगी शिवराज धोत्रे (रा. एन-५, सिडको) यांची ३ लाख, आकाश अशोक घोरपडे (रा. पिंप्रीराजा) यांची ५ लाख ५ हजार, सुनीता गजानन देशमुख (रा. जय भवानीनगर) १३ लाख २९ हजार ५१ रुपये, अच्युत गणपत राऊत (रा. वाळूज महानगर) यांची १४ लाख ७० हजार, कांता एकनाथराव उकिर्डे (रा. जय भवानीनगर) यांची ६ लाख रुपये, श्रीकांता निरंजन कवडे (रा. एसटी कॉलनी, सिडको, मुकुंदवाडी) यांची ९ लाख ५० हजार रोकड आणि दागिन्यांचे २ लाख २९ हजार ८०७ रुपये, अशी एकूण ५४ लाख २८ हजार ८५८ रुपयांची फसवणूक केली फिर्यादीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com