Chh. Sambhaji Nagar : झेंडूच्या फुलांना आला भाव; पितृपक्षात १०० रुपये किलो दराने विक्री शेतकऱ्यांत समाधान

झेंडूच्या जातीनुसार उत्पन्न घेतले जाते. त्यानुसार त्याचे दरही ठरविले जातात. यावर्षी ज्या आशेने उत्पन्न चांगले घेतले आहे.
flower
flower sakal

दीपक सिरसाठ

अंधारी - झेंडूच्या फुलांना बाजारात चांगली मागणी असून सध्या सुरु असलेल्या पितृपक्षात ही फुले चक्क १०० रुपये किलो दराने खरेदी केली जात असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गतवर्षी झेंडूला चांगला दर मिळाल्याने अंधारीसह परिसरातील शेतकरी झेंडू पिकाकडे वळले असून सिल्लोड तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झेंडूचे उत्पादन घेतले जात. झेंडूच्या जातीनुसार उत्पन्न घेतले जाते. त्यानुसार त्याचे दरही ठरविले जातात. यावर्षी ज्या आशेने उत्पन्न चांगले घेतले आहे. त्याची पूर्तता या दसऱ्याला चांगला दर मिळून पूर्ण होईल अशी अशा शेतकऱ्यांना आहे.

सध्या पितृ पक्षातही झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असून शेतकऱ्याला १०० किलोचा भाव मिळत असून हे दर असेच कायम राहिल्यास दसऱ्याला शेतकरी राजाला चांगला नफा मिळणार आहे.

flower
Chh. Sambhaji Nagar : शहरात २१ ठिकाणी ‘हायफाय’ स्वच्छतागृहे; नऊ कोटींचा खर्च, वाहनांच्या चार्जिंगचीही असेल सुविधा

परिसरात वीस गुंठे क्षेत्रात येथील अण्णा पवार यांना झेंडूच्या फुलांसाठी आतापर्यंत १० हजाराच्या आसपास खर्च आला आहे. झेंडूच्या फुलांपासून दीड लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली. तर जातवा येथील शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली असून नवरात्रोत्सव आणि दसर्यात चांगला नफा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

flower
Chh. Sambhaji Nagar : वाराणसीच्या धर्तीवर होणार आंतरराष्ट्रीय स्टेडियम विकसित

यंदा झेंडूला दर चांगला असून फुलांवर कीड पडल्यामुळे औषधींचा खर्च होत आहे. झेंडूवर पांढरी माशी, मावा, तुडतुडे यामुळे थोड्याफार प्रमाणात उत्पन्नात घट होऊ शकते.

अण्णा पवार, शेतकरी, जातवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com