Aurangabad Girl Slaps Drunk Truck Driver for Harassment
esakal
मुलीला एकटं बघून ड्रायव्हरने अश्लील इशारे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेनंतर तरुणीने हिंमत दाखवत ड्रायव्हरच्या कानशिलात लगावली. या प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होतो आहे. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आरोपी ड्रायव्हरने तरुणीची माफीही मागितली. शिवराम तानाराम देवासी (४८, रा. हुबळी, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.