Air India: युद्धाचा फटका; विमानप्रवास महागणार, एअर इंडियाची घोषणा
Rising Jet Fuel Prices Impact Air Travel: छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी एअर इंडियाच्या विमानसेवेवर १२ मार्चपासून ३९९ रुपयांचा इंधन अधिभार लागू होणार आहे. वाढत्या ATF किमतीमुळे प्रवाशांना तिकीटांसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : वाढत्या जेट इंधन दरांचा परिणाम आता विमानप्रवासावर दिसू लागला आहे. छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी सुरू असलेल्या नियमित विमानसेवेचा प्रवास येत्या काही दिवसांत महाग होण्याची शक्यता आहे.