

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरात सहाव्या दिवशीही डिझेलचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळित झाला होता. ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वाहनचालकांच्या रांगा लागत आहेत. कंपनीकडून वेळेवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत नसल्याने पंपचालक आणि वाहनधारकांमध्ये वारंवार वाद होत आहेत. अनेक ठिकाणी इंधन संपले असे फलक लावण्यात आले असून काही पंपांवर मर्यादित प्रमाणातच इंधन देण्यात येत आहे. अशात शनिवारी (ता. २३) पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली.