

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: ग्रामीण भागात डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने मंगळवारी (ता. १९) तेथील पंपांवरील डिझेल संपले. ही गर्दी शहराकडे वळली. त्यामुळे इथल्या पंपांवर रांगा लागल्या. ही गर्दी पाहून पेट्रोल संपले की काय या धास्तीने शहरवासीयांनीही पेट्रोल पंप गाठले. या गोंधळामुळे काही पंप थोड्या वेळासाठी, तर काही पंप दिवसभर बंद ठेवण्याची वेळ आली. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ९५ पैशांची वाढ झाल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला.