

Fake Disability Certificates
sakal
छत्रपती संभाजीनगर : बनावट दिव्यांग प्रमाणपत्राआधारे काहींनी राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये सरकारी नोकरी मिळाविल्याचा संशय आहे. त्या आधारे सरकारने २४१ संशयित कर्मचारी-अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. याबाबत दिव्यांग कल्याण विभागाने जिल्हा परिषदांचा संबंधित विभागांकडून अहवाल मागितला. पण, दोन वेळा मुदतवाढ देऊनही अहवाल आला नाही. आता तिसऱ्यांदा स्मरणपत्र देण्यात आले आहे.