

Chhatrapati Sambhajinagar Abuse of mentally challenged children: Tied and beaten in school, chilling video surfaces.
esakal
Chhatrapati Sambhajinagar Mandki Crime Video : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात लहानग्या मतिमंद मुलांना बेदम मारहाण केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. व्हायरल व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे हे अमानवी कृत्य जगासमोर आले असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या निष्पाप चिमुकल्यांना वेदना सांगता येत नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातील भीती आणि शरीरावरील जखमा सगळं सांगून जातात