Chhatrapati Sambhajinagar : कोयत्याने हल्ला करणाऱ्या दोघांना पोलिस कोठडी

घरासमोर गप्‍पा मारत उभ्‍या असलेल्या लोकांना शिवीगाळ करुन कोयत्‍याने वार करत पैसे लांबविण्यात आले होते.
police
police esakal

छत्रपती संभाजीनगर : घरासमोर गप्‍पा मारत उभ्‍या असलेल्या लोकांना शिवीगाळ करुन कोयत्‍याने वार करत पैसे लांबविण्यात आले होते. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी शनिवारी (ता. ११) सायंकाळी दोघांना अटक केली. त्‍यांच्‍याकडून गुन्‍ह्यातील रक्कम हस्‍तगत करण्‍यात आली आहेत.

सागर कडुबा वाघ (वय २०), सुनील उत्तम झिने (वय १९, दोघे रा. संजयनगर, मुकुंदवाडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्‍यांना १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए. आर. देवरे यांनी रविवारी (ता. बारा) दिले. मुकुंदवाडी परिसरातील छत्रपती कॉलनीत राहणारे रमेश गंगाराम नरहिरे हे १० मार्च रोजी रात्री सव्‍वानऊ वाजेच्‍या सुमारास घरासमोर नातेवाईक व वाचमनसह गप्‍पा मारत होते.

police
Pune Crime : धक्कादायक! भर रस्त्यात चुंबन घेतलं अन् म्हणाला लग्न कर नाही तर...तरुणावर गुन्हा दाखल

त्‍यावेळी आरोपी तेथे आले, त्‍यांनी काही कारण नसताना फिर्यादी व त्‍यांच्‍या नातेवाइकांना शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीच्‍या खिशात १८०० रुपये काढले. त्यावेळी वॉचमन अशोक डरफे याने आरोपींना अडविण्‍याचा प्रयत्‍न केला असता आरोपींपैकी एकाने त्‍यांच्‍या हातावर कोयत्याने वार केला. त्‍यानंतर आरोपींनी फिर्यादीच्‍या नातेवाईकाच्‍या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. आरोपींना रविवारी न्‍यायालयात हजर करण्‍यात आले होते.

police
Satara : जखिणवाडीत डोक्यात पहार घालून वडीलांचा मुलाकडून खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com