Pregnant Woman Death in Chhatrapati Sambhajinagar
esakal
पतीनं दुसरं लग्न केलं म्हणून गरोदर पत्नीनं स्वत:चं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरात ही घटना घडली आहे. आयशा अरबाज शेख असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.