औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, मुंबईत बैठक

दर १५ दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे योजनेचा आढावा घेतील.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेची गती वाढवा अशी सूचना केली आहे. आज शुक्रवारी (ता.१७) मुख्यमंत्र्यांनी शहरातील पाणीप्रश्नावर बैठक घेतली. या प्रसंगी त्यांनी नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला. दर १५ दिवसांनी मुख्यमंत्री ठाकरे हे योजनेचा आढावा घेतील. भाजपच्या वतीने औरंगाबादमध्ये (Aurangabad) जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही पाणीप्रश्नावर आंदोलन करण्यात आले होते. (Chief Minister Uddhav Thackeray Take Aurangabad Water Supply Scheme Review In Mumbai)

Uddhav Thackeray
पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा खोतांना टोला

या आंदोलनामुळे पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला फटका बसू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतः पाणीप्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालत असताना दिसत आहेत. आजच्या बैठकीला पालकमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय आदी उपस्थित होते. या प्रसंगी पांडेय यांनी नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा अहवाल सादर केला.

Uddhav Thackeray
एलाॅन मस्क यांच्याविरोधात २० हजार अब्ज रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाणीपुरवठा योजनेची गती वाढवण्याचे आदेश दिले. यावेळी शहराच्या जुन्या ५६ एमएलडी पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी २०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com