esakal | फुडप्रोसेसिंगसाठी शेतकऱ्यांच्या मुलांना फुडपार्कमध्ये गाळे - उद्योगमंत्री देसाई
sakal

बोलून बातमी शोधा

सुभाष देसाई

फुडप्रोसेसिंगसाठी शेतकऱ्यांच्या मुलांना फुडपार्कमध्ये गाळे - उद्योगमंत्री देसाई

sakal_logo
By
मधुकर कांबळे/अतुल पाटील

औरंगाबाद: बिडकीन परिसरात फुडपार्क उभारण्यात येत आहे. शेतमालावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्यासाठी एमआयडीसीकडून गाळे उपलब्ध करून दिले जातील अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

हेही वाचा: दिलासादायक! जालन्यात कोरोना पॉझिटिव्ह रेट ९.९२ टक्के

जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता. तीन ) त्यांनी जिल्हा व शहरातील विकास प्रकल्पासंबंधी नऊ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणाऱ्या सादरीकरणाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना टमाट्याला चांगला भाव मिळाला नसल्याने त्यांनी तो रस्त्यावर टमाटे फेकून दिले, शेतमालाचे नुकसान टाळण्याच्या अनुषंगाने शहर, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फुड प्रोसेसिंग युनिट यावेत यादृष्टीने विचारलेल्या प्रश्‍नावर ते म्हणाले, बिडकीन परिसरात फुड प्रोसेसिंग पार्क स्थापन केली आहे.

गेल्यावर्षी मुख्यमंत्री इथे आल्यावर त्यांनी फुडपार्कची घोषणा केल्यानंतर एमआयडीसीने तिथे सर्व सुविधा तयार करून आता भुखंडांचे वाटप करणे सुरू केले आहे. तसेच उद्योजकांना या परिसरात अधिकाधिक फुड प्रोसेसिंग उद्योग सुरू करण्याबाबत आवाहन केले आहे. यामुळे शेतमालावर प्रक्रिया करून त्याची साठवणुक होईल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि शेतमालाचे नुकसान टळेल.

हेही वाचा: Aurangabad:परिचारिकांच्या बदल्यांना स्थगिती

तसेच शेतकऱ्यांच्या युवा पिढीने छोटे-छोटे फुड प्रोसेसिंग इथे सुरू केले तर त्यांना गाळे बांधून देण्याची एमआयडीसी तयारी आहे. ज्यांना ते विकत घेणे शक्य नाही त्यांना ती भाड्यानेही देण्याची तयारी आहे. यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला.

loading image
go to top